मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप

अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप

यापूर्वी 2019 मध्येही या लेखिकेविरोधात एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. 12 जून रोजी हा चित्रपट Amazon Prime वर रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी 2019 मध्येही या लेखिकेविरोधात एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. 12 जून रोजी हा चित्रपट Amazon Prime वर रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी 2019 मध्येही या लेखिकेविरोधात एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. 12 जून रोजी हा चित्रपट Amazon Prime वर रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

शीखा धारिवाल/ मुंबई, 6 जून : प्राईम व्हिडीओवर 12 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाच्या लेखिका जुही चतुर्वेदी यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

वकील रिजवान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, गुलाबो सिताबो चित्रपटाची संहिता स्वर्गीय राजीव अग्रवाल यांनी लिहिली होती आणि जुही चतुर्वेदी यांनी संहिता चोरली आहे. राजीव अग्रवाल यांचं निधन झालं असून त्यांचा मुलगा आकिरा यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसमध्ये त्यांनी संहिता दाखविण्याची मागणी केली आहे.

वकील रिजवान सिद्दीकींद्वारा आकिरा यांनी ही नोटीस चित्रपट दिग्दर्शक सुजीत सरकार आणि निर्माते अरिजीव ध्रुव लहरी आणि लेखिका जुही चतुर्वेदी यांना पाठवली आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे संहिता चोरण्याचा आरोप केला आहे. मात्र अद्याप कोणीच ही संहिता दाखवलेली नाही. यापूर्वी 2019 मध्येही जुही चतुर्वेदी यांच्यावर एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप करण्यात आला होता.

लेखक राजीव अग्रवाल यांचा मुलगा आकिरा यांच्याकडून या प्रकरणाची माहिती स्क्रीन रायटर असोसिएशनला देण्यात आली असून असोसिएशननेही जुही चतुर्वेदी यांनी संहिता दाखवण्यास सांगितले आहे.

वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे क्लाइंटचे वडील राजीव अग्रवाल यांनी स्क्रीन रायटर असोसिएशनच्या एका स्क्रिप्ट रायटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये जुही चतुर्वेदी परीक्षक होत्या. राजीव अग्रवाल यांचा दावा आहे की, असोसिएशनला याबाबत माहिती आहे. यादरम्यान जुहीने संहिता चोरली आहे. त्यामुळे वारंवार सांगूनही त्या गुलाबो सिताबो या चित्रपटाची संहिता असोसिएशनसमोर ठेवत नाही. आकिरा उद्या या प्रकरणात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात संहिता चोरल्याची तक्रार दाखल करणार आहे.

12 जून रोजी हा चित्रपट Amazon Prime वर रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

News18 ने या प्रकरणाबाबत गुलाबो सीताबो या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजित सरकार यांच्याशीही बातचीत केली. आणि चित्रपटाच्या पटकथा संबंधित प्रश्न विचारला. यावेळी सुजितने सांगितले की, 'गुलाबो सिताबो या चित्रपटाच्या लेखिका जूही चतुर्वेदी यांनी या विषयावर आपले बाजू मांडली आहे. आणि त्यांनी गुलाबो सीताबो या चित्रपटाची संहिता स्क्रीन रायटर असोसिएशनला दिली आहे. आमचा आमच्या चित्रपटावर पूर्णपणे विश्वास आहे. अवघ्या 2 मिनिटांच्या ट्रेलरवरुन कोणीही संहिता सारखी असल्याचे कसं म्हणू शकतं? महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2018 मध्ये म्हणजेच स्क्रीन रायटर असोसिएशनच्या  स्क्रिप्ट रायटिंग स्पर्धेच्या आधीच 2018 मध्ये जुहीने कथेची नोंदणी केली होती, त्याशिवाय जुहीने ती स्क्रिप्ट केव्हाच वाचली नाही.'

हे वाचा -जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज

First published:

Tags: Bollywood