झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. झी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यात मुघल सैन्य संभाजी राजेंना कैद करताना दिखवण्यात आलं आहे. या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. लवकरच ही मालिका संपणार आहे. मात्र या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आजारावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक, पाहा Angrezi Medium Trailer
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका अग्गबाई सासूबाई ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणार येऊन थांबली आहे. सासूबाईंच्या लग्नासाठी शुभ्रा पुढाकार तर घेते पण खरी परिक्षा सुरू होते ती सासूबाईंच्या लग्नानंतर एकीकडे सोहम आईला कायमचं घरी आणण्यासाठी कारस्थान करत आहे तर दुसरीकडे आजोबा घरी येण्याचा रस्ता विसरतात. ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीवच्या किनाऱ्यावर मौनी रॉयचा बोल्ड अंदाज, शेअर केले TOPLESS फोटो
कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' सेलिब्रेटी पॅटर्नमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. TRP रेटिंगमध्ये 'चला हवा येऊ द्या'नं दुसऱ्या स्थानावर कायम आहे. या शोनं प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच लोकप्रियता मिळवली आहे. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकानं पुन्हा एकदा टीआरपी लिस्टमध्ये अव्वल कायम ठेवलं आहे. या मालिकेतील माया या नव्या पात्रात एक वेगळीच रंगत आणली आहे.
मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही TPR लिस्टमध्ये Zee Marathi च्या मालिकांनीच बाजी मारली आहे. टॉप 5 मध्ये सर्व मालिका या Zee मराठीच्या आहेत. तेजश्री प्रधाननं पहिल्याच बॉलिवूड सिनेमात दिला LIP LOCK सीन, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.