Home /News /entertainment /

आजारावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक, पाहा Angrezi Medium Trailer

आजारावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक, पाहा Angrezi Medium Trailer

हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो आणि काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो

    मुंबई, 13 फेब्रुवारी : अभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असलेला अंग्रेजी मीडियम हा सिनेमा मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यात हिंदी मीडियममध्ये शिकलेला इरफान खाननं आपल्या मुलीच्या परदेशातील शिक्षण घेण्याच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या बापाची भूमिका साकारली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला इरफान खान त्याच्या मुलीच्या शाळेत भाषण देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची मुलगी त्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र समस्या असते ती या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा. पण इरफान आपल्या मुलीला आश्वासन देतो की, वेळ पडल्यास रक्त विकून तुझ्या फीचा पैसा उभा करेन. पण 3 कोटीची रक्कम जमवणं सोपी गोष्ट नसते... त्यात अनेक समस्या येतात. हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो. काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो आणि पुन्हा हसवण्यात यशस्वी ठरतो. अनन्या पांडे की सारा अली खान? कोणाला डेट करतोय कार्तिक आर्यन अंग्रेजी मीडियम या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी इरफान खाननं एक भावूक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं प्रकृतीच्या कारणानं या सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत व्यक्त केली. VIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा व्हिडीओमध्ये या सिनेमाच्या सेटवरील काही दृश्य पाहायला मिळत आहेत तर व्हिडीओच्या बॅकग्राउंडला इरफान खानचा आवाज ऐकू येतो. इरफान म्हणतो, नमस्कार माझ्या बंधू-भगिनींनो, मी इरफान. मी आज तुमच्यासोबत आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. पण हा सिनेमा ‘अंग्रेजी मीडियम’ माझ्यासाठी खूप खास आहे. या सिनेमाचं प्रमोशन जोरदार करावं आणि त्यात मी सुद्धा सहभागी असावं अशी माझी खरंच खूप इच्छा होती. मात्र माझ्या प्रकृतीच्या कारणानं मी ते करु शकत नाही.... हा सिनेमा तुम्हाला शिकवेल, हसवेल, रडवेल आणि पुन्हा हसवेल... हा सिनेमा नक्की पाहा आणि हो माझी वाट पाहा... हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात इरफान खानसोबत करिना कपूर, राधिका मदन, पंकड त्रिपाठी, किकू शारदा, रणवीर शोरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मागील वर्षी (2018) त्याला 'हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर'चं निदान झालं होतं. मागच्या वर्षी प्रकृतीत सुधारणा झाल्यानं इरफाननं अंग्रेजी मीडियम सिनेमाचं शूट सुरू केलं मात्र या सिनेमाचं शूट संपल्यावर त्याला पुन्हा एकदा उपचारासाठी लंडनला परतावं लागलं. लग्न झालेलं असूनही बॉलिवूडचा प्रसिद्ध गीतकार पडला होता पुन्हा प्रेमात!
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Irfan Khan

    पुढील बातम्या