मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नव्या मालिकेसाठी कोल्हापुरात लय भारी प्रमोशन: ताराराणी चौक असा सजला

नव्या मालिकेसाठी कोल्हापुरात लय भारी प्रमोशन: ताराराणी चौक असा सजला

स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका निर्मिती करणारी जगदंब क्रिएशनची टीम, कलाकार यांनी रविवारी छत्रपतींची राजधानी असणार्‍या करवीरला भेट दिली. यावेळी ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

  • Published by:  News18 Trending Desk

कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणार्‍या रणरागिणी ताराराणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’  (swaraj saudamini tararani) ही मालिका सोमवारपासून (दि. 15) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका निर्मिती करणारी जगदंब क्रिएशनची टीम, कलाकार यांनी रविवारी छत्रपतींची राजधानी असणार्‍या करवीरला (कोल्हापूर) भेट दिली.  यावेळी ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व कलाकार मंडळीनीं मिळून मालिकेचं जोरदार प्रमोशन केले. यावेळी ताराणी चौक संपूर्ण फुलांनी सजवला होता.

या प्रमोशन सोहळ्याला शाहू महाराज, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच मालिकेच मुख्य भूमिकेत दिसणारे कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मालिकेचे प्रमोशन करण्यात आलं.  एकाद्या ऐतिहासिक मालिकेचे पहिल्यांदाच अशा थाटात प्रमोशन करण्यात आलं.

वाचा : चिरंजीवीसोबत सलमान करणार डान्स; या सिनेमातून करणार टॉलीवूडमध्ये एंट्री

यावेळी डॉ. अमोल कोल्हे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार असल्याचे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. तसेच सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवारदरम्यान सायंकाळी 7.30 वाजता ताराराणींच्या इतिहासाचे पैलू उलगडणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

First published:

Tags: Entertainment, Kolhapur, Marathi entertainment, Tv serial