मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Godfather' मध्ये Chiranjeevi सोबत सलमान खान करणार डान्स; बॉलीवूडनंतर टॉलीवूडमध्ये करणार दबंग एंट्री

'Godfather' मध्ये Chiranjeevi सोबत सलमान खान करणार डान्स; बॉलीवूडनंतर टॉलीवूडमध्ये करणार दबंग एंट्री

 सलमान खानने चिरंजीवी स्टारर 'गॉडफादर' ’ (Godfather) चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. दबंग खान या चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

सलमान खानने चिरंजीवी स्टारर 'गॉडफादर' ’ (Godfather) चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. दबंग खान या चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

सलमान खानने चिरंजीवी स्टारर 'गॉडफादर' ’ (Godfather) चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. दबंग खान या चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 15 नोव्हेंबर : चिरंजीवी (Chiranjeevi) हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे, तर दुसरीकडे सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा दबंग स्टार आहे. दोघांचाही आपापल्या इंडस्ट्रीत वेगळी ओळख आहे. या दोघांचेही चित्रपट अभिनयापेक्षा त्यांच्या नावावर जास्त चालतात. दुसरीकडे हे दोन्ही स्टार्स पडद्यावर एकत्र आले तर प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळेल. सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे, पण आता या बातमीला दुजोरा मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने चिरंजीवी स्टारर 'गॉडफादर' ’ (Godfather) चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. दबंग खान या चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 'गॉडफादर' हा चिरंजीवीच्या कारकिर्दीतील 153 वा चित्रपट असेल, तर साऊथ इंडस्ट्रीतील सलमानचा हा डेब्यू चित्रपट असेल. वाचा : अभिनेता सोनू सूदची बहिण निवडणुकीच्या रिंगणात, लढवणार निवडणूक चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा मल्याळम थ्रिलर 'लूसिफर' ’ (Lucifer) चा तेलगू (Lucifer telugu Remake) रिमेक असेल. हा सिनेमा मोहन राजा दिग्दर्शित करत आहेत. 'लूसिफर'मध्ये 'दृश्यम 2' फेम मोहनलाल महत्त्वाच्या भूमिकेत होता तर त्याच्या तेलगू आवृत्तीत चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहे. चिरंजीवीसोबत सलमान खानही यात एका खास भूमिकेत दिसणार आहे. वाचा : राजकुमार राव - पत्रलेखाची लग्नपत्रिका झाली लीक, खूप खास आहे कार्ड गॉडफादर'मध्ये सलमान खानच्या एंट्रीबद्दल संगीतकार एसएस थमन (SS Thaman) यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी अलीकडेच एका मुलाखती दरम्यान सांगितले की, बॉलीवूड अभिनेता सलमान खान मोहन राजाच्या 'गॉडफादर' चित्रपटातील एका गाण्यात चिरंजीवीसोबत डान्स करण्यासाठी तयार झाला आहे आणि चाहत्यांसाठी हा नक्कीच मोठा क्षण असेल.ते म्हणाले की, 'सलमान खान आणि चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. हॉलिवूड गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या गॉडफादरमधील (Hollywood singer Britney Spears) गाण्याबद्दल थमनने सांगितले की, ती या चित्रपटात तेलुगू गाणे गाणार की इंग्रजी या विषयावर अजूनही चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता Satyadev Kancharana ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan

पुढील बातम्या