मुंबई, 17 फेब्रुवारी : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर ने शुक्रवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला तिच्या लग्नाची बातमी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्वराने गुपचूप समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद झिरार अहमद यांच्याशी लग्न केले आहे. जानेवारी मध्येच तिने फहाद सोबत कोर्ट मॅरेज केलं तर काल साखरपुडा करत सर्वांना धक्का दिला. आता लवकरच धुमधडाक्यात दोघे लग्न करणार आहेत. तिने सोशल मीडियावर लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच या नवीन जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. स्वरा भास्करच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि यासोबतच तिचे एक जुने ट्विटही चर्चेत आले आहे. स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी ऐकून सगळेच अवाक झाले आहेत. या लग्नाबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत असतानाच, 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारीला तिने पतीविषयी केलेले ट्विटही चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये स्वराने पती फहादचा चक्क भाऊ म्हणून उल्लेख केला आहे. यामुळे स्वरा आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिचं हे ट्विट सध्या खूपच व्हायरल होत आहे. हेही वाचा - Swara Bhasker Wedding: शाहीनबागच्या आंदोलनात फहादच्या प्रेमात पडली स्वरा; नवरा नक्की आहे तरी कोण? या व्हायरल ट्विटमध्ये स्वराने पती फहाद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, ‘हॅपी बर्थडे फहाद मियाँ. माझ्या भावाचा आत्मविश्वास अबाधित राहावा, आनंदी राहा, सेटल हो, म्हातारा होत आहेस… आता लग्न कर. तुला हे वर्ष छान जावो मित्रा.’ या ट्विटला फहादनेही प्रत्युत्तर देत लिहिले कि, ‘धन्यवाद. तू माझ्या लग्नाला येशील असं वचन दिलं होतंस… तू लग्नाला ये मी मुलगी शोधली आहे.’
शुक्रिया ज़र्रानवाज़ी का दोस्त 💛
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) February 2, 2023
भाई के कॉन्फिडेंस ने तो झंडे गाड़े है वो तो बरकरार रहना ज़रूरी है….और हाँ, तुमने वादा किया था तुम मेरी शादी में आओगे तो वक़्त निकालो….लड़की मैंने ढूँढ ली है 😎😎😎 https://t.co/fHHS1CXiH2
या दोघांचं हे ट्विट वाचून आता लोकांना आश्चर्य वाटत असून भाऊ-बहीण सांगून लग्न कसं होणार असं म्हणत आहेत. नेटकरी या ट्विटवर आता मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने या ट्विटवर कमेंट केलीये कि, ‘भाऊ तुम्ही दोघांनी क्रॅश कोर्स केला आहे की 15 दिवसात व्हॅलेंटाइनचा प्रभाव पडला आहे?’ ते काहींनी ‘अरे, तुम्ही दोघे भाऊ-बहिण होता ना?’ असं म्हटलं आहे. तरी काही नेटकरी ‘तुम्ही दोघंही एकमेकांच्या लग्नाबद्दल विचारत होता, तुम्ही स्वतःच लग्न केलं, लग्न करायचंच होतं मग भाऊ का केलंस?’ असं म्हणत तिला ट्रोल देखील करत आहेत.
फहाद अहमदसोबत लग्नानंतर स्वरा भास्करने ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती फहादसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, ‘कधीकधी तुम्ही ते संपूर्ण जगात शोधता, जे तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांची जाणीव झाली. फहाद अहमद तुझे माझ्या आयुष्यात मनापासून स्वागत आहे.’