Home /News /entertainment /

स्वप्नील जोशी 19 एप्रिलची आतुरतेनं पाहतोय वाट, हे आहे कारण

स्वप्नील जोशी 19 एप्रिलची आतुरतेनं पाहतोय वाट, हे आहे कारण

स्वप्नील जोशीनं न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हमधून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं आपण 19 एप्रिलची आतुरतेनं वाट पाहत असल्याचंही सांगितलं.

  मुंबई, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झालं आहे. त्यामुळे नेहमीच बीझी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटींकडे सुद्धा बराच रिकामा वेळ आहे. त्यामुळे सध्या सगळेच सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत. इन्स्टग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनं सुद्धा आज न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हमधून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं आपण 19 एप्रिलची आतुरतेनं वाट पाहत असल्याचंही सांगितलं. स्वप्नीलची समांतर ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती. ज्याला सर्वांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पण फार कमी लोकांना माहित आहे की स्वप्नील जोशीनं वयाच्या 9 व्या वर्षी उत्तर रामायणात काम केलं होतं आणि यात त्यानं कुशची भूमिका साकारली होती. सध्या रामायणच्या रि-टेलिकास्टला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे आता रामायणनंतर येत्या 19 एप्रिल पासून उत्तर रामायणचं रि-टेलिकास्ट होणार आहे. त्यासाठी स्वप्नील खूप उत्सुक आहे. बॉयफ्रेंड असावा तर असा! पत्रलेखासाठी राजकुमार झाला हेअर स्टायलिस्ट, पाहा VIDEO आपल्या रामायण मधील प्रवासाविषयी बोलताना स्वप्नील म्हणाला, 'कुशची भूमिका जेव्हा मी साकारली त्यावेळी मी अवघ्या 9 वर्षांचा होता. मला जेव्हा आता कळलं की उत्तर रामायण सुद्धा रि-टेलिकास्ट होणार आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. इतक्या वर्षांनंतर मला पुन्हा एकदा मी लहान असताना कसं काम केलं होतं हे पाहण्याची संधी मिळणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.' अनुष्कानं केली विराटच्या चाहत्याची नक्कल, म्हणाली; ओय कोहली चौका मार ना... रामायणातील बाकी भूमिकांप्रमाणेच सध्या सोशल मीडियावर लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकारांचीही सध्या बरीच चर्चा आहे. लव-कुश यांच्या भूमिका त्यावेळी स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षेत्रमाडे यांनी साकारल्या होत्या. यात स्वप्नील कुशच्या भूमिकेत दिसला होता आणि आज एवढया वर्षांनंतर स्वप्नील मराठी सिने इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध चेहरा बनला आहे.
  स्वप्नीलनं 'मितवा', 'दुनियादारी' यासारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली त्याची 'समांतर' ही वेब सीरिज सुद्ध प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, पाहा VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Swapnil joshi

  पुढील बातम्या