Home /News /entertainment /

मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, रितेशनं शेअर केला VIDEO

मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, रितेशनं शेअर केला VIDEO

रितेश देशमुखनं शेअर केलेल्या पोलीसांच्या या व्हिडीओनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

    मुंबई, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सर्वांना सक्तीनं घरी राहवं लागत आहे. पण अशात या काळात ज्या लोकांचे वाढदिवस आहेत त्यांचा खूप हिरमोड झालेला आहे आणि ती लहान मुलं असतील तर त्याहून कठिण परिस्थिती पाहायला मिळते. अशात अभिनेता रितेश देशमुखनं शेअर केलेल्या एका व्हिडीओनं सर्वांची मनं जिंकली आहेत. रितेशनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसांला कोणीच आलं नाही. त्यामुळे या व्यक्तीनं हीच गोष्ट पोलिसांनी सांगितली. त्यावर पोलिसांनी त्या लहान मुलाला सरप्राइझ देत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओे रितेशनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर खूप व्हायरल होताना दिसत आहे. इब्राहिम अली खानचा TikTok वर डेब्यू, VIDEO मध्ये उलगडली फॅमिली सीक्रेट्स रितेशनं शेअर केलेल्या या व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण पोलिसांचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ भारतातला नाही तर अमेरिकेतला आहे. या व्हिडीओतील पोलिसांच्या कृतीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना रितेशनं लिहिलं, USA मध्ये एका वडीलांनी पोलिसांना कॉल केला आणि सांगितलं, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मुलाच्या वाढदिवसाला कोणीच आलेलं नाही. यावर पोलिसांनी सुद्धा काय शानदार प्रतिक्रिया दिली आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे 'महाभारत'ची गांधारी, ओळखू येणार नाही एवढा बदलला लुक आपल्या अभिनयासोबतच रितेश देशमुख त्याच्या सामाजिक कामासाठी आणि विचारांसाठी सुद्धा ओळखला जातो. अनेकदा तो सामाजिक मुद्द्यावर आपली मत सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतो. त्याच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो शेवटचा 'बागी 3' मध्ये दिसला होता. या सिनेमात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन, म्हणाली...
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Coronavirus, Riteish Deshmukh

    पुढील बातम्या