अनुष्कानं हा व्हिडीओे इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला वाटतं तो सध्या त्याचं क्रिकेट खूप मिस करत आहे. त्याला ग्राऊंडवर असताना मिळणार प्रेक्षकांचं प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळणारं प्रेम आणि खास करुन अशा टाइपचे चाहते... म्हणून मी त्याला घरीच हा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.' या व्हिडीओमध्ये विराट ज्या प्रकारे तिला लुक देतो ते बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे मात्र नक्की. इब्राहिम अली खानचा TikTok वर डेब्यू, VIDEO मध्ये उलगडली फॅमिली सीक्रेट्स अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर 2018 पासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. तिनं शेवटचं शाहरुख खान सोबत झिरो सिनेमात काम केलं होतं. मात्र मागच्या वर्षभरात तिनं एकही सिनेमात काम केलेलं नाही किंवा नवा प्रोजेक्ट साइन केलेला ऐकिवात नाही. गोल्ड मेडलिस्ट आहे 'महाभारत'ची गांधारी, ओळखू येणार नाही एवढा बदलला लुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Bollywood, Virat kohali