Home /News /entertainment /

बॉयफ्रेंड असावा तर असा! पत्रलेखासाठी राजकुमार झाला हेअर स्टायलिस्ट, पाहा VIDEO

बॉयफ्रेंड असावा तर असा! पत्रलेखासाठी राजकुमार झाला हेअर स्टायलिस्ट, पाहा VIDEO

राजकुमार राव मागच्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री पत्रलेखासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

  मुंबई, 17 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नाही, समान्य पर्सनॅलिटी अशा परिस्थिती पदार्पण करणाऱ्या राजकुमारनं स्वतःचं वेगळं स्थान बी-टाउनमध्ये निर्माण केलं. सध्याच्या नवोदित अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव शानदार अभिनयासाठी नेहमीच घेतलं जात. याशिवाय राजकुमार त्याच्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहतो. सध्या राजकुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यावर कोणाही म्हणेल की बॉयफ्रेंड असावा तर असा. राजकुमार राव मागच्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री पत्रलेखासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पत्रलेखानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राजकुमार राव तिचा हेअरकट करताना दिसत आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत. हे दोघंही त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, पाहा VIDEO
  View this post on Instagram

  जहाँ चाह वहाँ राह 💇🏽 @rajkummar_rao ❤️⭐️

  A post shared by Patralekhaa (@patralekhaa) on

  राजकुमार रावच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो शेवटचा मौनी रॉयसोबत दिसला होता. याशिवाय त्याच्याकडे रूही अफ्जा हा सिनेमा आहे. ज्यात तो जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पत्रलेखाच्या करिअर बद्दल बोलायचं तर तिनं हंसल मेहता यांच्या सीटी लाइट या सिनेमात राजकुमार रावसोबत काम केलं होतं. याशिवाय तिनं लव्ह गेम आणि नानू की जानू या सिनेमात काम केलं आहे. अभिनेत्यानं केलं चीनचं Tik Tok अ‍ॅप बॅन करण्याचं आवाहन, नेमकं काय आहे कारण इब्राहिम अली खानचा TikTok वर डेब्यू, VIDEO मध्ये उलगडली फॅमिली सीक्रेट्स
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Rajkumar rao

  पुढील बातम्या