मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Swapnil Joshi: 'शेवट कधीच सोपा नसतो...' तू तेव्हा तशी मालिकेला निरोप देताना स्वप्नील जोशीला अश्रू अनावर

Swapnil Joshi: 'शेवट कधीच सोपा नसतो...' तू तेव्हा तशी मालिकेला निरोप देताना स्वप्नील जोशीला अश्रू अनावर

स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी

'तू तेव्हा तशी' ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मालिकेच्या शेवटच्या दिवशी स्वप्नीलने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च : मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशी ओळखला जातो. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने आज मराठी मालिका, चित्रपट, सोबतच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वप्नील जोशी झी मराठीवरच्या 'तू तेव्हा तशी' मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्याची ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. पण आता ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मालिकेच्या शेवटच्या दिवशी स्वप्नीलने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील जोशीची तू तेव्हा तशी मालिकेतील सौरभ पटवर्धन ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेचा वेगळा विषय आणि मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनामिका आणि सौरभची जोडी चांगलीच हिट झाली. पण आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. आज मालिका निरोप घेणार असून कलाकार चांगलेच इमोशनल झालेले पाहायला मिळाले. आता स्वप्नीलने देखील अशाच आशयाची पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि आप नेत्याची लगीनघाई? दोन्ही कुटुंबात लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात

या पोस्टमध्ये स्वप्नीलने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलंय कि, 'शेवट कधीच सोपा नसतो! आज रात्री T3 संपत आहे.  या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते. इथे  तयार झालेले बंध आणि हे आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं झीचं कुटुंब. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.' पुढे स्वप्नील म्हणाला आहे, 'आम्ही आमच्या कामाला कौटुंबिक कार्यक्रम  म्हणतो! आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता मालिका संपणार असल्याने आम्ही रोज भेटणार नसलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू!' अशा भावना स्वप्नीलने व्यक्त केल्या आहेत.

स्वप्नीलची ही  पोस्ट वाचून चाहते देखील भावुक झालेले पाहायला मिळालं आहे. त्यांनी अशाच कमेंट केल्या आहेत. स्वप्निलच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'मिस यु पट्या', 'आम्ही या मालिकेला मिस करू' अशा कमेंट केल्या आहेत.

तू तेव्हा तशी या मालिकेत पट्या आणि मिस अनामिकाची अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कॉलेजमध्ये एकमेकांवर प्रेम करणारे अनामिका आणि पट्या अनेक वर्षांनी एकमेकांना भेटतात आणि पुन्हा नव्यानं एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली होती. स्वप्निलने सौरभ तर मिस अनामिका ही भूमिका अभिनेत्री शिल्पा तुळसकरने साकारली होती. मालिकेत स्वप्निल जोशी आणि  शिल्पा तुळसकर सोबतच सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. आता आजपासून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi Serial, Swapnil joshi, Zee Marathi