मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि आप नेत्याची लगीनघाई? दोन्ही कुटुंबात लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि आप नेत्याची लगीनघाई? दोन्ही कुटुंबात लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात

बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे

बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे

परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय चाललंय, याची देशभर चर्चा होत आहे. पण आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च: बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीती एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय चाललंय, याची देशभर चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्यामुळेच हे दोघे  रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे. पण आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारी परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर डिनरला जाताना स्पॉट झाले होते, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते लंचसाठी जाताना दिसले. एकाच गाडीतून दोघेही एकत्र या लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट झाले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. हे दोघेही शिक्षणासाठी लंडनमध्ये एकत्र होते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी भाष्य केलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे समोर आले आहे. आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कमल हसनच्या 'त्या' एका सल्ल्यानं बदललं रजनीकांतचं आयुष्य; मराठमोळा तरुण असा झाला तमिळचा थलाइवा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांचे नाते केवळ दोघांपुरतेच मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहीत आहे. दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत असल्याने दोघांमध्ये खूप कॉमन गोष्टी आहेत. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबीय लग्नाचा विचार करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना हे दोघे लंच आणि डिनर डेटसाठी स्पॉट झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्यांच्या लग्नाची औपचारिक घोषणा होऊ शकते, तसेच त्यांचा रोका समारंभही होईल. अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान दोघेही त्यांच्या कामांमध्ये व्यग्र असल्याने या समारंभासाठी तारखा काढणे तसे कठीण आहे, मात्र जेव्हा कधी या सोहळ्याचे आयोजन केले जाईल तेव्हा त्याकरता जवळच्या व्यक्तींनाच त्यामध्ये सहभागी केले जाणार आहे. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये कियारा नंतर परिणीती सुद्धा लवकरच लग्नगाठ बांधणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

या दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती असं सांगितलं जातं. दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात ते ७५ पुरस्कार विजेत्यांपैकी एक होते. आता हे दोघे लग्नगाठ बांधणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Parineeti Chopra