मुंबई, 04 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. नुकतंच तिने काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला होता असा खुलासा केला होता. अभिनेत्रीनं केलेल्या या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती. तिने चाहत्यांना तिची तब्येत आता व्यवस्थित असल्याचं सांगितलं होतं. आता त्यानंतर पहिल्यांदाच सुष्मिता सेनने लाईव्ह येत चाहत्यांना आपली अवस्था दाखवली आहे. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. तब्येतीचे अपडेट देताना तिने चाहत्यांना तिच्याबद्दल अनेक गोष्टी देखील सांगितल्या आहेत. सुष्मिताने लाईव्ह येत आता तिची तब्येत एकदम ठीक असल्याचे सांगितले आहे. पण तरीही तिला थोडासा अशक्तपणा आहे तसेच ताप, सर्दी, खोकला देखील आहे. बोलताना देखील तिचा घसा खवखव होता. ती थोडी अस्वस्थ असल्याचं दिसली. यावेळी सुष्मिता सेन म्हणाली की, ‘सध्या अनेकांनी मला माझ्या तब्येतीबद्दल विचारले. माझी विचारपूस केली, त्या सर्वांचे अनेक आभार. सगळ्यांनी खूप मेसेज आणि कॉल्स केले. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्या सर्वांचे आभार. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. Akshay Kumar: अक्षय कुमारनं चक्क घागरा घालून लगावले ठुमके; नेटकरी म्हणाले, ‘फ्लॉप सिनेमांमुळं…’ इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान हार्ट अटॅकवर बोलताना सुष्मिता सेनच्या डोळ्यात अश्रू आले. ती चांगलीच इमोशनल झालेली पाहायला मिळाली. सुष्मिता सेनने यावेळी तिच्या जिम आणि वर्कआउटचाही उल्लेख केला. तिने हार्ट अटॅकमधून तारण्यासाठी तिच्या फिटनेसचा खूप उपयोग झाल्याचे म्हटले आहे.तिच्या हृदयाच्या ९५ टक्के भागात ब्लॉकेज होते. पण जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे ती लवकर बरी झाली आहे. तसेच यावेळी तिने सगळ्या चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.
सुष्मिता सेनने यावेळी ती लवकरच बरी होऊन आर्या ३ च्या सेटवर परतणार असल्याचं सांगितलं आहे.सुष्मिताच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर येणाऱ्या काळात ती आर्या 3 या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ‘आर्या’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. तिला आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तसंच येणाऱ्या काळात ती आर्या सोबतच येणाऱ्या काळात ताली या वेबसिरीज मध्ये देखील दिसणार आहे.
सुष्मिता 47 वर्षांची आहे आणि तिला नेहमीच फिट राहायला आवडते. अभिनेत्री अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा या वयातील फिटनेस पाहून अनेक चाहत्यांना प्रेरणा मिळते. असे असतानाही तिच्यसोबत घडलेल्या या प्रकाराने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. प्रत्येकजण सुष्मिताच्या पोस्टवर कमेंट करत तिला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.