मुंबई, 17 मे : सिनेमांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अनेक खोट्या कास्टिंग एजंट्सनी लोकांची फसवणूक केल्याची प्रकरणं तर नेहमीच समोर येत असतात. पण आता सलमान खानची प्रोडक्शन कंपनी सलमान खान फिल्मच्या नावानं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात SKF च्या नावानं काही लोकांना इ-मेल पाठवण्यात आले आणि सलमानच्या आगामी सिनेमाच्या ऑडिशनची खोटी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण टीव्ही अभिनेता अंश अरोरानं उजेडात आणलं आणि याबाबत पोलिसात FIR सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
अंश अरोरानं या प्रकरणाचा नुकताच खुलासा केला. याबाबत एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार अंश अरोराला shruti@salmankhanfilm.com वरुन एक मेल आला होता. ज्यात त्याला सलमानच्या सिनेमात भूमिका ऑफर केली गेली होती. या मेलच्या आधारावरच अंशनं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना अंशनं सांगितलं, त्याला या मेलमध्ये सलमान खानचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है 3'च्या खलनायकी भूमिकेसाठी निवडण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याशिवाय 3 मार्चला सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांच्यासोबत एक मिटिंग असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. पण नंतर ही मिटिंग रद्द झाल्याचं सांगिण्यात आलं. अंशनं सांगितलं की या दरम्यान त्याचं श्रुती नावाच्या एका महिलेशी बोलणं झालं होतं.
जेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा
अंशनं सांगितलं की, मला फक्त मेलच आला नाही तर माझ्याशी कॉल आणि मेसेज वरूनही संपर्क करण्यात आला. ज्यात सिनेमासाठी प्रोफाइल आणि व्हिडीओ पाठवण्यास सांगितलं गेलं होतं. मला त्यावेळी हे समजत नव्हतं की सलमान आणि प्रभूदेवानं मला केवळ व्हिडीओ बेसिसवर कसं काय सिलेक्ट केलं. अंश अरोरानं 'कसम', 'क्वीन' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.
VIDEO : कतरिनासाठी दबंग खाननं गायलं रोमँटिक गाणं, पाहत राहिला विकी कौशल