मुंबई, 17 मे : सध्या कोरोना व्हायरसनं देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या बॉलिवूडचे सर्वच सेलिब्रेटी आपापल्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी राहिले आहे. त्यामुळे चाहत्यांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग सोशल मीडिया हाच ठरत आहे. सध्या सर्वच सेलिब्रेटी सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण सुद्धा सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. सध्या तो एका थ्रोबॅक फोटोमुळे खूप चर्चेत आला आहे. ज्यामुळे 25 वर्षांपूर्वी बरेच वाद झाले होते.
मिलिंद सोमणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो न्यूड असलेला दिसत आहे. मिलिंदनं हे फोटोशूट 1995 मध्ये त्याची त्यावेळची गर्लफ्रेंड मधू सप्रे हिच्यासोबत केलं होतं. हे फोटोशूट एक जाहिरातीसाठी करण्यात आलं होतं आणि हे न्यूड फोटोशूट त्यावेळी खूपच वादग्रस्त ठरलं होतं. या फोटोमध्ये हे दोघंही न्यूड असून त्यांनी गळ्यात साप अडकवला आहे. त्यावेळी सोशल मीडियावर फारसा नसला तरी मिलिंदवर बरीच टीका झाली होती. हाच फोटो मिलिंदनं आता पुन्हा एकदा शेअर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
सलमानच्या नावानं फसवणूक करत होती महिला, अभिनेत्यानं केला पर्दाफाश
हा फोटो शेअर करताना मिलिंदनं लिहिलं, '25 वर्षांपूर्वीचा हा फोटो. त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं, इंटरनेटही फारसं वापरलं जात नव्हतं. पण मला जाणून घ्यायला आवडेल की हा फोटो आज रिलीज झाला तर लोकांच्या प्रतिक्रया काय असतील' मिलिंदच्या या फोटोवर अनेक युजर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. ज्यात सर्वाधिक युजर्सनी त्याच्या त्यावेळच्या या धाडसाचं कौतुक केलेलं पाहयला मिळत आहे. आता न्यूड फोटोशूट ही सामान्य बाब असली तरीही 25 वर्षांपूर्वी असं धाडस करणारा मिलिंद हा एकमेव मॉडेल होता.
अभिनेत्याची आई कोरोना पॉझिटीव्ह; पण रुग्णालयात बेड मिळेना
View this post on Instagram
#Throwback thursday . . . The Ridge, Delhi, 1991 . . . . 📷 @bharatsikkastudio
मिलिंद सोमण त्याच्या भूमिका आणि मॉडेलिंग करिअरमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. याशिवाय त्याचं लग्नही चर्चेत राहिलं होतं, मिलिंदनं दोन वर्षांपूर्वी स्वतःहून निम्म्या वयाच्या अंकिता कोनवार हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती. मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर 'फोर मोअर शॉट्स प्लिज' या त्याच्या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे ज्यातील त्याच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा झाली.
जेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा