कुत्रा चावल्यानं बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता माझं आयुष्य कधीच...

कुत्रा चावल्यानं बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता माझं आयुष्य कधीच...

संपूर्ण जग कोरोनासारख्या संकटाशी लढत असताना ही अभिनेत्री सध्या तिच्या आयुष्यात सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : जगात सतत काही ना काही विचित्र घटना घडत असतात. त्यामुळे कधी कोणासोबत काय घडेल आणि त्याचे काय परिणाम होतील याचा काही नेम नसतो. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत अशीच एक विचित्र घटना घडली. संपूर्ण जग कोरोनासारख्या संकटाशी लढत असताना ही अभिनेत्री सध्या तिच्या आयुष्यात सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यातला हा कठीण प्रसंग सर्वांशी शेअर केला आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अर्जुन', 'आदत' आणि 'कितनी मोहब्बत 2'मधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणारी अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगाला समोरी जात आहे. चेहऱ्याला कुत्र्यानं चावा घेतल्यानं ही अभिनेत्री मागच्या काही काळापासून टीव्ही शोमधून गायब आहे. दरम्यान यानंतर तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पण आता माझं आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं होणार नाही अशी खंत सनानं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केली.

सनानं नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिच्यासोबत घडलेल्या या भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. यासोबतच तिनं या प्रसंगातून मी स्वतःला सावरत असले तरी मला आता जीवनाची भीती वाटू लागली आहे. आता माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. आता ते कधीच पूर्वीसारखं होऊ शकणार नाही असं म्हटलं आहे. सनाची ही भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तिनं लिहिलं, तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मी गायब झाले नव्हते. हे सर्व मी खूप उशिरानं बोलत आहे. पण माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून मला माझ्या सुंदर चेहऱ्याचा अभिमान होता. प्रेम होतं पण कुत्र्यानं माझ्या चेहऱ्याचा चावा घेतला. त्यानंतर मला चेहऱ्याची सर्जरी करावी लागली. ज्या मुलीला पूर्वी प्राणी आवडत असत तिला आता त्यांचा तिरस्कार वाटू लागलाय. आता आयुष्यभरासाठी हे व्रण माझ्या चेहऱ्यावर राहतील. ही घटना मी कधीच विसरू शकणार नाही. आता माझ्या आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं होऊ शकत नाही.

First published: May 17, 2020, 7:06 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या