VIDEO: असं काय झालं की सिद्धार्थ जाधव सईला म्हणाला, ‘तुम तो धोकेबाज हो’ Sai Tamhankar | siddharth Jadhav

VIDEO: असं काय झालं की सिद्धार्थ जाधव सईला म्हणाला, ‘तुम तो धोकेबाज हो’ Sai Tamhankar | siddharth Jadhav

Sai Tamhankar Viral Video सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सई ताम्हणकरला धोकेबाज म्हणताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : मराठी सिने सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. लवकरच तिचा गर्लफ्रेंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र सध्या सईची चर्चा होतेय ती तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओची. या व्हिडिओमध्ये ती मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत दिसत आहे आणि त्यावेळी सिद्धार्थ जाधव तिला धोकेबाज म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टायटॅनिकचा अभिनेता चेन्नईच्या मदतीला आला धावून, केली 'ही' कमेंट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा सई-सिद्धार्थचा व्हिडिओ सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सई आणि सिद्धार्थ ‘तुम तो धोकेबाज हो’ या हिंदी गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना सिद्धार्थनं लिहिलं, ‘दोन मॅड एकाच फ्रेममध्ये, हिम्मतराव आणि राधिका मॅडम पुन्हा एकदा.’ सिद्धार्थनं या पोस्टमध्ये स्वतःला हिम्मतराव तर सईला राधिका मॅडम म्हटलं आहे. ही दोन्ही नावं त्याच्या टाइम प्लिज या सिनेमातील भूमिकांची आहेत. याला सिद्धार्थनं सई सिद्धूचा स्वॅग असा हॅशटॅग वापरला आहे. खरं तर हा व्हिडिओ सिद्धार्थनं खूप आधी शेअर केला होता मात्र सईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आदित्य पांचोली मानहानी प्रकरणी कंगना आणि रंगोली यांना कोर्टाकडून समन्स

 

View this post on Instagram

 

Two Mads in one Frame🖼 Himmatrao & radhika madam once again... @saietamhankar #saisiddhuchaswag #timeplease #siddhuchaswag

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

सईनं नुकताच 33 वा वाढदिवस साजरा केला. सध्या ती आगामी सिनेमा ‘गर्लफ्रेंड’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या 26 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सई दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता अमेय वाघ सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. एका वेगळ्या धाडणीची लव्हस्टोरी आणि सोबतच तुफान कॉमेडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ जाधव ‘एक टप्पा आउट’ या कॉमेडी टिव्ही शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

==============================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 26, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading