जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushmita Sen Daughter: सुष्मिता सेनची 13 वर्षांची लेक सोशल मीडियावर होतेय ट्रोल; कारण वाचून व्हाल हैराण

Sushmita Sen Daughter: सुष्मिता सेनची 13 वर्षांची लेक सोशल मीडियावर होतेय ट्रोल; कारण वाचून व्हाल हैराण

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन

सुष्मिता सध्या आपली मुलगी अलिशासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या क्यूट व्हिडिओमध्ये आई-मुलीची बॉन्डिंग पाहून चाहते खूश झाले आहेत, पण याच व्हिडिओमध्ये तिच्या मुलीवरून तिला ट्रोल केलं जात आहे. नक्की का ट्रोल होतेय सुष्मिताची लेक जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै :  बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन कायम चर्चेत असते. याचं कारण कधी तिचे चित्रपट असतात तर कधी तिचं वैयक्तिक आयुष्य असतं. सुष्मिताच्या लव्ह लाईफची नेहमीच चर्चा होते. पण आता सुष्मिता तिच्या धाकट्या लेकीमुळे चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपली मुलगी अलिशासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या क्यूट व्हिडिओमध्ये आई-मुलीची बॉन्डिंग पाहून चाहते खूश झाले आहेत, पण याच व्हिडिओमध्ये तिच्या मुलीवरून तिला ट्रोल केलं जात आहे. नक्की का ट्रोल होतेय सुष्मिताची लेक जाणून घ्या. सुष्मिता सेन लग्न न करताच दोन मुलींची आई आहे. तिने अवघ्या 24 व्या वर्षीच मुलगी दत्तक घेत तिला एकटीनं सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१० मध्ये तिने दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं आहे. सुष्मिताच्या चाहत्यांना तिच्या या गोष्टीचा खूपच अभिमान आहे. तिच्या लेकी देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्रीनं आपल्या धाकट्या लेकीचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. सुष्मिता मुलगी अलिशासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. याविषयी तिने सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली आहे. पण तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळेच लोक तिच्या अवघ्या 13 वर्षांच्या लेकीला ट्रोल करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

सुष्मिता सेनने मुलगी अलिशासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘माझी मॅजिकल अलिशा. परदेशात अभ्यासासाठी जाण्यापूर्वी माझ्या शोनाची पहिली पॅरिस-फ्रान्सची ट्रिप. वेळ कसा उडून जातो समजत नाही… मी नेहमी आपल्या डान्सला मिस करेन.’ असं म्हणत तिने लेकीला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. VIDEO: ‘भारतीय सिनेमात फक्त हीप्स आणि बुब्स…’ प्रियांकाने उडवली बॉलिवूडची खिल्ली; ‘ते’ वक्तव्य चर्चेत सुष्मिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल होऊ लागला. काही नेटकऱ्यांनी अलिशाच्या ड्रेसिंगकडे बोट दाखवलं आहे. अलिशाच्या कपड्यांवरून सुष्मिताला ट्रोल केलं जातंय. ‘एक १३ वर्षांची लहान मुलगी असे कपडे कसे घालू शकते’ असं नेटकरी म्हणत आहेत. तर  काही जण सुष्मिताला टोमणे मारत आहेत. पण सुष्मिताच्या बऱ्याच चाहत्यांनी अभिनेत्रीला पाठींबा दिला आहे. सुष्मिताची दुसरी मुलगी रेनीने या पोस्टवर ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ अशी कमेंट केली आहे.

जाहिरात

सुष्मिताच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर, ती आता हृदयविकाराच्या झटक्यानंतर बरी झाली आहे आणि पुढे ती ‘आर्य सीझन 3’ मध्ये दिसणार आहे. ही वेब सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. याशिवाय ती ‘ताली’ मध्ये दिसणार आहे, जो जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात