मुंबई, 06 जुलै : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा या ना त्या कारणाने चर्चेत असते. प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर प्रियांकाने हॉलीवूडकडे आपला मोर्चा वळवला. तिथेही अभिनेत्रीनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रियांकाने आतापर्यंत बॉलिवूड सोडण्याची कारणं सांगत अनेक खुलासे केले आहेत. आताही प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, जो इंटरनेटवर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाने बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. या क्लिपमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नक्की काय म्हणाली प्रियांका चोप्रा जाणून घ्या. प्रियांका चोप्राचा हा व्हिडिओ जुना असून आता पुन्हा तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या क्लिपमध्ये भारतीय सिनेमांबद्दल बोलताना प्रियांकाने बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे.
प्रियांका चोप्राचा व्हायरल झालेला व्हिडिओ 2016 च्या एमी अवॉर्ड्समधील आहे. या व्हिडिओमध्ये अवॉर्ड शोदरम्यान अँकरने तिला भारतीय सिनेमाबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. अँकरने प्रियांकाला भारतीय चित्रपटातील काही डान्स मूव्ह दाखवण्यास सांगितले. यावर प्रियांका म्हणते, ‘भारतीय चित्रपट गाण्यांमध्ये फक्त हिप्स आणि बुब्सवरच फोकस करतात.’ एवढं बोलून अभिनेत्री नंतर काही डान्स स्टेप्स करून दाखवते. अभिनेत्रीचं हे वक्तव्य मात्र काही नेटकऱ्यांना पटलेलं नाही. बॉलिवूडनेच प्रियांकाला ओळख मिळवून दिली आणि आता ती परदेशात राहून भारतीय सिनेमाची खिल्ली उडवत आहे असं म्हणत नेटकरी तिच्यावर निशाणा साधत आहे. ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री झाली आई; बॉलिवूडपासून दूर परदेशात राहून करतेय ‘हे’ काम प्रियांका चोप्राचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एकाने तिला ट्रोल करत लिहिले, ‘हो, तोच सिनेमा, जिथे तू तेच काम करायचीस आणि लोकांच्या मागे फिरायचीस.’ तर एकाने लिहिले, ‘तू 2-4 हॉलिवूड चित्रपटांत काम काय केलंस आणि लगेच तू कोण आहेस, कुठून आलीस हे विसरलीस.’ तर दुसऱ्या एकाने संताप व्यक्त करत लिहिलंय की, ‘भारतीय सिनेमानं तिच्यावर बंदी घालायला पाहिजे, मग समजेल’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. प्रियांकाचे हे वक्तव्य बहुतांश लोकांना पसंत पडलेलं नाही. त्यामुळेच अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे.
In an Old video,from Emmy awards in 2016 Priyanka Chopra was asked by a reporter to show some indian movies dance moves. PeeCee than said Indian movies is are all about “ Hips and Boobs”. by u/Left_Bee5657 in BollyBlindsNGossip
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, प्रियांका चोप्रा कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. पण आता बातमी येत आहे की, प्रियांकाने हा चित्रपट सोडला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.