मुंबई 31 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी (Sushant Singh Rajput) आत दररोज नव नवीन माहिती बाहेर येत आहे. सुशांतचे मित्र आणि जवळचे लोक खुलासे करत असून पोलीस त्यानुसार तपासही करत आहेत. 14 जूनला सुशांतने मुंबईत त्याच्या घरीच आत्महत्या केली होती. त्याच दिवशी सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा मित्रही त्याच्याच घरी होता. सिद्धार्थने त्या रात्री नेमकं काय झालं त्याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
सिद्धार्थ म्हणला, काही वर्षांपासून सुशांत आणि माझी मैत्री होती. एका कॉमन मित्रामुळे आमची सुशांतशी मैत्री जमली होती. गिटार वाजविण्यापासून ते देवपूजा करण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आम्ही सोबतच करत होते. सिद्धार्थ हा क्रिएटिव्ह कंटेंट रायटर आहे. अध्यात्म हा त्याचा आणि माझा आवडीचा विषय होता असंही त्याने सांगितलं.
सुशांतने ज्या ‘150 ड्रिम्स’चं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी त्याच्यासोबत होतो असंही तो म्हणाला. घटनेच्या दिवशी सुशांत तसा शांतच होता. संध्याकाळी सोबत जेवण करत आम्ही गप्पा केल्या. नंतर झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेलो. रात्री 1 वजाता सुशांत माझ्या खोलीत आला आणि मी अजुन का झोपलो नाही असं त्याने विचारलं.
अंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही
त्यानंतर मी त्याला त्याच्या रुम पर्यंत जाऊन सोडून आलो. नंतर सकाळी घरी स्वयंपाक करणाऱ्या मुलाने सांगितले की सुशांतच्या रुमचं दार बंद आहे. नंतर मी आणखी काही मित्रांना कळवलं. त्यानंतर जेव्हा दार उघडण्यात आलं तेव्हा सुशांत मृतावस्थेत आढळून आला. तो असं काही करेल याचा काहीच अंदाज आला नाही.
रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दलही सिद्धार्थने काही गोष्टी सांगितल्या. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत हे मला माहित होतं. मात्र त्याबद्दल मी सुशांतशी कधी फारसा बोलत नसे. त्यांच्या नात्याबद्दल मला आदर होता. त्यांच्या नात्यात चढ उतारही होते.
सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही; CA ने केला मोठा खुलासा
8 जूनला रियाने घर सोडलं. तिची प्रकृती ठिक नव्हती असं तीने सांगितलं. सुशांतची काळजी घे असंही ती जातांना म्हणाली. सुशांतच्या कुटुंबीयांसोबतही माझा संपर्क होता. मात्र सुशांतनेच त्यांच्याशी बोलू नको असं सांगितलं होतं अशी माहितीही सिद्धार्थ पिठानीने दिली आहे.