जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही; CA ने केला मोठा खुलासा

सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही; CA ने केला मोठा खुलासा

सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही; CA ने केला मोठा खुलासा

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या सीएने मोठी माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी ईडीने (Enforcement Directorate) गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या सीएने (CA) मोठा खुलासा केला आहे. सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही, अशी माहिती सुशांतचे सीए  संदीप श्रीधर यांनी दिली आहे. संदीप श्रीधर गेल्या एक वर्षांपासून सुशांतचे सीए आहेत. सुशांतच्या सर्व बँक खात्यांची माहिती त्यांच्याकडे आहे. सुशांतच्या कुटुंबाने रिया आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे कोट्यवधी रुपये लुटल्याचा आरोप केला आहे. दरम्यान सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालेला नाही, असं सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनी दिली आहे. सुशांतच्या कुटुंबाला 15 कोटींच्या व्यवहाराबाबतची माहिती कुठून मिळाली माहिती नाही किंवा सुशांतचं दुसरं बँक खातं असेल आणि तिथून हा व्यवहार झाला असेल तरी त्याची कल्पना आपल्याला माहिती, असं संदीप म्हणालेत. तसंच ईडी तपासासाठी आल्यासही आपण 15 कोटींचा व्यवहार झाला नाही हे दाखवू शकतो, असंही सीए श्रीधर यांनी सांगितलं. हे वाचा -  सुशांत आत्महत्या प्रकरण : आणखी एक अभिनेता उतरला मैदानात, सीबीआय चौकशीसाठी दबाव ईडीने याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले, त्यांची चौकशी ई़डीकडून केली जाणार आहे. बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्रे बिहार पोलिसांकडे मागितली होती. त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसंच सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती. हे वाचा -  रिया म्हणजे विषकन्या, सुशांतच्या मृत्यूला ‘गँग’ जबाबदार; मंत्र्यांचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखल करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लाॅंड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात