Home /News /entertainment /

वाद चिघळणार! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा

वाद चिघळणार! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा

सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे भावनिक नाते राहिले नव्हते, असंही राऊत यांनी त्या लेखात म्हटलं होतं.

    पाटणा 10 ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajputs) याच्या आत्महत्या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झालीय. सुशांतच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी ‘सामना’चे संपादक आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशांतचे चुलत भाऊ आणि बिहार भाजपचे आमदार नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलंय. नीरज सिंह यांच्या या इशाऱ्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. राऊत यांनी रविवारच्या रोखठोक सदरात सुशांतचे वडिल के.के. सिंह यांच्याबद्दल केलेल्या लिखाणामुळे सुशांतचं कुटुंब नाराज असल्याचं म्हटलं जातं. के.के. सिंह यांनी दोन लग्न केले आहेत. त्यामुळे सुशांत हा नाराज होता. तो त्यांच्या कुटुंबीयांशी बोलतही नव्हता. सुशांतचा बिहारशी तसा काहीच संबंध नव्हता. त्याला सगळं मुंबईने दिलं होतं असंही राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं होतं. एक सुशांत; बाकी अशांत! एका आत्महत्येचं राजकारण! असा लेख राऊत यांनी सामनाच्या रविवार पुरवणीत लिहिला होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे भावनिक नाते राहिले नव्हते. वडिलांना फुस लावून FIR दाखल केला गेला असंही राऊत यांनी त्या लेखात म्हटलं होतं. काय लिहिलं होतं राऊतांनी? या प्रकरणात पोलिसांनी यासंदर्भात झीरो एफआयआर दाखल करून तपास सुरू ठेवायला हवा होता, (पण सुशांतच्या नातेवाईकांना तेव्हा कुणाविरुद्धही एफआयआर नोंदवायचा नव्हता व ते कुटुंब सुशांतच्या आत्महत्येनंतर सरळ पाटण्यात पोहोचले.) आदित्य ठाकरेंचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र, पण सुशांत प्रकरणात...;राऊतांचे थेट सवाल भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचे ठरवले व मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यांचे नाव या प्रकरणाशी जोडून सनसनाटी निर्माण केली. दुसऱ्या बाजूला दोन इंग्रजी वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांना सुशांतप्रकरणी आव्हान देत राहिल्या. त्यामुळे पोलीस गोंधळले. Sushant Death Case : आत्महत्येच्या काही दिवसांआधी सुशांतने उचलला होता रियावर हात हे प्रकरण ‘हाय प्रोफाईल’ होत आहे असे दिसून येताच मुंबई पोलिसांतर्फे एक दिवसाआड तपासाबाबत माहिती पत्रकारांसाठी जाहीर करायला हरकत नव्हती. यात कुणी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती असेल तर पोलीस त्याचेही स्टेटमेंट घेतील, असे सुरुवातीलाच सांगायला हरकत नव्हती. सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रिया चक्रवर्तीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती! मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे असंही राऊत यांनी त्या लेखात लिहिलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या