Sushant Death Case : आत्महत्येच्या काही दिवसांआधी सुशांतने उचलला होता रियावर हात, पोलिसांनी कोर्टात माहिती

Sushant Death Case : आत्महत्येच्या काही दिवसांआधी सुशांतने उचलला होता रियावर हात, पोलिसांनी कोर्टात माहिती

या प्रकरणी आता तपासाचा रिपोर्ट मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. उद्या या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput case) प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे.  सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली, त्याआधी  रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि त्याचे जोरदार भांडण झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे.

'सुशांत आणि रिया चक्रवर्तीमध्ये आत्महत्येपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता.  हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी एकमेकांवर हात उचलला होता. त्यामुळे रागारागा रिया सुशांतचे घर सोडून गेली होती. एवढंच नाहीतर रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला होता' अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

संजय राऊतांचा दावा ठरला खोटा, सुशांतच्या मामाने केला मोठा खुलासा

रिया चक्रवर्तीने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात असंही सांगितले आहे की, 'एकदा घरी पार्टी देण्यात आली होती. त्यावेळी सुशांतची बहिण सुद्धा सहभागी झाली होती.'

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घरात जेव्हा पार्टी संपली होती तेव्हा सुशांतची बहिण ही रियाच्या रूममध्ये आली होती आणि तिने रियाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. रियाने दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सुशांतला सांगितली, पण त्याने या गोष्टीकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला.'

रियाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सुशांतच्या बहिणीलाही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले होते. पण, तिने कोणताही जबाब दिला नाही.

मोडून पडला संसार तरी...! मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 'ती' 7 तास पाण्यात उभी राहिली

दरम्यान, आज रिया चक्रवर्ती हीचा सीए रितेश हा देखील ईडी कार्यालय येथे पोहचला. रिया हीच्या आर्थिक प्रश्नांची माहिती देण्यासाठी श्रुती आणि रितेश यांना मदतीसाठी बोलवले होते. तर या प्रकरणी आता तपासाचा रिपोर्ट मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. उद्या या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Published by: sachin Salve
First published: August 10, 2020, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या