Sushant Singh Rajput: संजय लिला भंसाळींची 3 तास चौकशी, विचारले हे प्रश्न

Sushant Singh Rajput: संजय लिला भंसाळींची 3 तास चौकशी, विचारले हे प्रश्न

भंसाळी यांनी सुशांतला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र दोघांच्या तारखा जमत नसल्याने ते एकत्र येऊ शकले नाहीत.

  • Share this:

मुंबई 6 जुलै: सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी (sushant singh rajput suicide case) पोलिसांच्या चौकशीला वेग आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज प्रसिद्ध निर्माते संजय लिला भंसाळी (sanjay leela bhansali) यांची चौकशी केली. ही चौकशी 3 तास सुरू होती. त्या दरम्यान भंसाळी यांना पोलिसांनी 6 ते 7 प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आणि पार्श्वभूमी जाणून घेतली आहे. भंसाळी यांनी सुशांतला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र दोघांच्या तारखा जमत नसल्याने ते एकत्र येऊ शकले नाहीत. भंसाळी सकाळीच बांद्रा पोलिसांच्या ऑफसमध्ये गेले आणि त्यांनी पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत.

मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात 28 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवून घेतला आहे. सुशांतसोबत ज्यांनी काम केलं, किंवा त्याच्याशी ज्यांचा संपर्क होता, काही वाद होते अशा सगळ्या लोकांना पोलीस चौकशीसाठी बोलवून घेत आहेत. सुशांतची मानसिक स्थिती, त्याची देहबोली, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याला आलेलं नैराश्य अशा सगळ्याच गोष्टींबद्दल पोलीस माहिती जाणून घेत आहे.

दरम्यान,  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) अजुनही त्याचं कुटुंब त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलं नाही. सुशांत हा त्याच्या कुटुंबात सर्वांचा लाडका होता. त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंह (Shweta Kirti Singh) आणि त्यात एक बॅण्डींग होतं. श्वेता सोशल मीडियावर आपल्या भावाविषयी कायम व्यक्त होत असते.

या दिवशी SSR च्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहता येणार; पोस्टर केला शेअर

त्यातून तिचं सुशांतवरचं प्रेम दिसून येतं. आपल्या लाडक्या भावाविषयी तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. स्वत:च्या अक्षरात तिने लिहिलंय की प्रिय सुशांत, ‘तुच सगळ्यात पहिले आहेस’. Love You. तिच्या या पोस्टवर आता सुशांतचे चाहते व्यक्त  होत असून त्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तिच्या या भावुक शब्दांनी सुशांतचे चाहतेही त्याच्या आठवणीने गहिवरून गेले आहेत.

सुशांतनं या कारणासाठी सोडला RAW सिनेमा, दिग्दर्शकांनाही बसला होता धक्का

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाची त्याचे वडिल के.के सिंह (K.K singh) यांनी CBI चौकशीची मागणी केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत अशी मागणी केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र आता त्याबद्दल सुशांतच्या कुटुंबीयांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी कुठलाही संशय नसून कुटुंबीयांनी अशी कुठलीही मागणी केली नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

वडिल के.के सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारची मागणी केल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र अशा प्रकारचं कुठलंही ट्विटर हँडल त्यांचं वडिलांचं नाही आणि 27 जून नंतर कुटुंबीयांकडून कुठलंही वक्तव्य देण्यात आलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

Published by: Priyanka Gawde
First published: July 6, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading