जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या दिवशी SSR च्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहता येणार; पोस्टर केला शेअर

या दिवशी SSR च्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहता येणार; पोस्टर केला शेअर

या दिवशी SSR च्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहता येणार; पोस्टर केला शेअर

सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरला प्रदर्शित करावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे, मात्र..

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै : कोरोना व्हायरसमुळे चित्रपट क्षेत्रातही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले आहे. परंतु अद्याप देशभर थिएटर्स बंद आहेत. ज्यामुळे चित्रपट ठरलेल्या तारखांना प्रदर्शित होत नाहीत. याचा निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे पाहता हॉटस्टार प्लस डिस्नी वर काही मोठे चित्रपट रिलीज होत आहेत, ज्यात अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा याचाही सहभाग आहे. डिस्नी प्लस हॉटस्टारने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजचा तपशील देण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी म्हणजे 6 जुलै 2020 रोजी रिलीज होत आहे. चित्रपटाचे एक छानसे पोस्टर शेअर केले गेले आहे आणि त्यासह कॅप्शनमध्ये लिहिले आहे - सर्व प्रेमकथा सुंदर आहेत. पण हा आमचा आवडता आहे. उद्या दिल बेचाराचा ट्रेलर बाहेर येईल. आमच्याशी संपर्कात रहा.

जाहिरात

हे वाचा - सुशांतच्या बहिणीने स्वत:च्या अक्षरात लिहिली भावुक पोस्ट, चाहतेही गहिवरले हा चित्रपट गेल्या वर्षापासून चर्चेचा विषय होता. पण सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चित्रपटाविषयी अधिक चर्चा सुरू झाली. हा चित्रपट सुशांतच्या कारकीर्दीचा शेवटचा चित्रपट असल्याने चाहते हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा अशी मागणी करत होते. पण हे शक्य नव्हते. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात