सुशांतनं या कारणासाठी सोडला RAW सिनेमा, दिग्दर्शकांनाही बसला होता धक्का

सुशांतनं या कारणासाठी सोडला RAW सिनेमा, दिग्दर्शकांनाही बसला होता धक्का

पीरियड थ्रीलर फिल्म रोमियो अकबर वॉल्टर (RAW)मध्ये सुशांतला स्पायच्या मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : अकाली जगाचा निरोप घेणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या फिल्मी प्रोजेक्टची लिस्ट तसं पाहायला गेलं तर खूप मोठी होती. त्याला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या मात्र त्यातील काही सिनेमा त्याच्या हातून निसटले सुद्धा होते. फितूर आणि हाफ गर्लफ्रेंड हे सिनेमा काही कारणानं सोडावे लागले होते. यात आता जॉन अब्राहम स्टारर RAW या सिनेमाची सुद्धा भर पडली आहे.

पीरियड थ्रीलर फिल्म रोमियो अकबर वॉल्टर (RAW)मध्ये सुशांतला स्पायच्या मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आलं होतं. जी भूमिका नंतर जॉन अब्राहमने साकारली. पण तो सिनेमा आधी सुशांतनं साइन केला होता. एवढंच नाही तर या सिनेमाचं पोस्टर सुद्धा सुशांतला फ्रंट आणि सेंटरला ठेऊन डिझाइन करण्यात आलं होतं. पण शेड्युल कॉनफ्लिक्टमुळे सुशांतला हा सिनेमा सोडावा लागला. सुशांतनं हा सिनेमा सोडल्यानंतर निर्माता बंटी वालिया आणि निर्देशन रोबी ग्रेवाल यांना सुद्धा धक्का बसला होता आणि सुशांतच्या जागेवर नवा अभिनेता शोधेपर्यंत त्यांनाही खूप त्रास झाला होता.

सुशांतला आवडली होती कथा

सुशांतनं अनेक मुलाखतीमध्ये या गोष्टीची कबुली दिली होती. त्याच्या पहिल्या सिनेमाच्या कमिटमेंटमुळे तो रोमियो अकबर वॉल्टर हा सिनेमा करू शकला नाही. सुशांतनं सांगितलं की, मला हा सिनेमा करायचा होता. कारण मला याची कथा खूप आवडली होती. हा सिनेमा हिट होईल याचा मला विश्वास आहे मात्र मी हा सिनेमा आता करू शकत नाही.

सुशांतला रॉ ची स्क्रीप्ट खूपच आवडली होती आणि त्याला हा सिनेमा करायचा होता. हा सिनेमा त्याच्या करिअरला नवं वळण देऊ शकत होता मात्र निर्मात्यांनी त्याला ज्या डेट्स दिल्या होत्या त्या आणि सुशांतच्या दुसऱ्या सिनेमाच्या डेट क्लॅश झाल्या. सुशांतनं निर्मात्यांकडे वेळ मागितला होता. सुशांतनं या सिनेमाचं शूटिंग 15 दिवसांत पूर्ण करायचं ठरवलं होतं मात्र निर्मात्यांना हे मान्य नव्हतं त्यांना या सिनेमासाठी 30 दिवस द्यायचे होते. जे सुशांतला शक्य नव्हतं अखेर सुशांतनं हा सिनेमा सोडला आणि तो नंतर जॉन अब्राहमला मिळाला.

First published: July 5, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या