मुंबई 4 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (sushant singh rajput suicide case) अनेक वादांनी जन्म घेतले आहेत. मुंबई पोलीस (Mumbai Police) सध्या या प्रकरणी सखोल तपास करत असून त्यांनी अनेक बड्या मंडळींना चौकशीसाठी बोलावलं आहे. हा तपास सुरू असतानाच महाराष्ट्र नव निर्माण सेनेची (MNS) भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर बॉलिवूडमध्ये वेगळी चर्चाही सुरू झाली होती. त्या वादावर आता खुद्द राज ठाकरेंनीच (Raj Thackeray) आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे. मनसेने अशी कुठलीही भूमिका घेतली नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या नवोदितांचा छळ केला जातो अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच छळामुळे सुशांतला नैराश्य आलं होतं असंही म्हटलं जातं. त्यामुळे अशा छळ होणाऱ्या कलाकारांनी काही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा खुलासा केला आहे. मनसेची ही भूमिका नसल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं असून त्यामुळे एका वादावर आता पडदा पडला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide)तपास अद्याप अंतिम टप्प्यामध्ये आलेला नाही. या प्रकरणी आता त्या हिरव्या कपड्याच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. खरंच सुशांतने त्या कपड्याचा वापर करून आत्महच्या केली का याबाबत तपास केला जाणार आहे. यामध्ये त्या कपड्याची क्षमता सुशांतचे वजन पेलावणारी होती का, याबाबत तपास केला जाणार आहे. KRK चा खोटारडेपणा उघड, सुशांतबाबत केलं होतं धक्कादायक वक्तव्य; पाहा VIDEO 14 जून रोजी, ज्यादिवशी सुशांतने आत्महत्या कली त्यादिवशी जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. मृतदेह लटकताना पोलिसांनी पाहिले नाही. सुशांतच्या घरामध्ये जे व्यक्ती उपस्थित होते, त्यांनी असा जबाब दिला होता की सुशांतने आत्महत्या केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने पंख्याला लटकून फाशी घेण्यासाठी हिरव्या रंगाच्या नाईट गाऊनचा वापर केला होता. संपादन - अजय कौटिकवार