Home /News /entertainment /

KRK चा खोटारडेपणा उघड, सुशांतबाबत केलं होतं धक्कादायक वक्तव्य; पाहा VIDEO

KRK चा खोटारडेपणा उघड, सुशांतबाबत केलं होतं धक्कादायक वक्तव्य; पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये मागच्या काही दिवसांपासून सुशांतच्या बाजूनं बोलणाऱ्या KRK ने त्याआधी सुशांतबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचं उघड झालं आहे.

    मुंबई, 4 जुलै : 'मरजावाँ' आणि 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक मिलाप जावेरी यांनी काही व्हिडीओ शेअर करत सेल्फ क्लेम क्रिटिक आणि अभिनेता कमाल रशिद खान याच्यावर निशाणा साधला आहे. ज्यात मागच्या काही दिवसांपासून सुशांतच्या बाजूनं बोलणाऱ्या KRK ने त्याआधी सुशांतबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचं उघड झालं आहे. पहिला व्हिडीओ सुशांतच्या सिनेमा रिलीजनंतरचा आहे. ज्यात त्यानं सुशांतबाबत बऱ्याच वाईट गोष्टी बोलल्या आहेत. तर दुसरा व्हिडीओ हा सुशांतच्या आत्महत्येनंतर श्रद्धांजली देण्यासाठी KRK नं सोशल मीडियावर शेअर केला होता. मिलापनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा KRK सुशांतवर टीका करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, माझ्यामते सुशांत सिंह राजपूतला अभिनय येतच नाही आणि एकता कपूरला दंड ठोठावायला हवा कारण तिनं त्याला लॉन्च केलं. साजिद नाडियाडवालाला सुद्धा फाइन भरायला लावला पाहिजे कारण त्यानं सुशांतला सिनेमासाठी 8 कोटी रुपये दिले. जो 8 लाख फी घेणारा अभिनेता आहे त्याला तुम्ही 8 कोटी कसे काय देता. यानंतर KRK चा तो व्हिडीओ सुरू होतो जो त्यानं सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी शेअर केला होता. सुशांतला श्रद्धांजली देताना शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कमाल रशीद खान सांगतो, आता जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत त्याची आठवण नेहमीच काढली जाईल. जोपर्यंत बॉलिवूड आहे तोपर्यंत एक प्रश्न नेहमी विचारला जाईल की एका यशस्वी अभिनेत्यानं वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या का केली. सुशांत आज मी खूप दुःखी आहे आणि तुला खूप मिस करत आहे. त्यानंतर KRK रडताना दिसतो. हे दोन्ही व्हिडीओ शेअर करताना मिलाप जावेरीनं KRK चा पर्दाफाश केला आहे. त्यानं लिहिलं, हा आहे खोटारड्या KRK चा खरा चेहरा. जो आज डोळ्यात खोटे खोटे अश्रू आणून सुशांतबद्दल बोलत आहे. मिलाप जावेरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं,सत्य हे आहे की, जेव्हा सुशांत जिवंत होता त्यावेळी हाच केआरके त्याच्यबद्दल अशा भयानक भावना ठेवून होता. KRK असा माणूस आहे जो आपल्या खोटारड्या वागण्यानं सुशांतचा अपमान करत आहे. त्याला थांबवण्याची गरज आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी. मिलाप याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Kamal khan, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या