Home /News /entertainment /

सुशांतच्या EX-मॅनेजरच्या घरी पोहोचले बिहार पोलीस, अभिनेत्याआधी तिनेही संपवलं होतं आयुष्य

सुशांतच्या EX-मॅनेजरच्या घरी पोहोचले बिहार पोलीस, अभिनेत्याआधी तिनेही संपवलं होतं आयुष्य

याप्रकरणी अधिक तपास करण्याआधी बिहार पोलीस दिशा सॅलियनच्या (Disha Salian) घरी पोहोचले आहेत. दिशा सुशांतची पूर्व-मॅनेजर आहे.

    मुंबई, 02 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांचा स्वतंत्रपणे तपास सुरु आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास करण्याआधी बिहार पोलीस दिशा सॅलियनच्या (Disha Salian) घरी पोहोचले आहेत. दिशा सुशांतची पूर्व-मॅनेजर आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी दिशाने देखील आत्महत्या केली होती. काही दिवसांच्या कालावधीमध्ये झालेल्या या दोन्ही घटनांमुळे बॉलिवूड हादरले होते. सुशांत 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. दरम्यान अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती. दिशा सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहायची. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच तो देखील असेच टोकाचे पाऊल उचलेल असे कुणाला वाटले नव्हते. सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि त्याचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीने झी न्यूजशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'सुशांत दिशाच्या मृत्यूनंतर खूप अस्वस्थ होता. दिशाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला मोठा धक्का बसला होता, त्याने लगेच टीव्ही सुरू केला. यावेळी त्याची बहिण, स्टाफ आणि मी देखील तिथेच होतो. तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तो घाबरला होता, त्याच्या बहिणीने त्याला जवळ घेतले.' (हे वाचा-..आणि म्हणून मी सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते,अंकिताचं स्पष्टीकरण) सिद्धार्थच्या मते, 'दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतला रडू कोसळले होते, त्याच्या बहिणीने त्याला पाणी दिले. तो कुणाला तरी फोन करत होता. तो या घटनेमुळे इतका अस्वस्थ झाला की त्याने मला त्याच्याबरोबर खोलीतच राहायला सांगितले. तो मीडिया दिशाच्या मृत्यूबाबत काय सांगते हे पाहण्यासाठी बातम्या देखील पाहत होता.' (हे वाचा-सुशांतच्या थेरपिस्टच्या वक्तव्यानं आत्महत्या प्रकरणाला नवं वळण,रियाची घेतली बाजू) सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहे. सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने देखील सोशल मीडियाद्वारे पंतप्रधानांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील असा दावा करत आहे की सुशांत कधी नैराश्यात नाही जाऊ शकत. या सगळ्यात जिच्यावर आरोप केले जात आहेत, ती सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने देखील व्हिडीओ शेअर करत न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. एकंदरित या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या