Home /News /maharashtra /

नाशकात खळबळ! कोविड हॉस्पिटल शिवसेनेच्या पुढाकारानं मात्र, उद्घाटन NCP नेत्याच्या हस्ते...

नाशकात खळबळ! कोविड हॉस्पिटल शिवसेनेच्या पुढाकारानं मात्र, उद्घाटन NCP नेत्याच्या हस्ते...

अगदी काल परवापर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता चक्क एकमेकांची स्तुती करताना दिसत आहे.

नाशिक, 2 ऑगस्ट: नाशिकच्या सिडको परिसरात रविवारी एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. मात्र, कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनावरून शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कारण येथील कोविड हॉस्पिटल हे शिवसेनेच्या पुढाकारानं उभारण्यात आलं आहे. मात्र, हॉस्पिटलचं उद्घाटन मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हेही वाचा... अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पुण्यातून जाणार पवित्र गोष्ट राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर होणाऱ्या अनेक कार्यक्रमातील व्यासपीठावर दिसणारा हा बदल आतापर्यंत नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अगदी काल परवापर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता चक्क एकमेकांची स्तुती करताना दिसत आहे. हे पाहून लोकांचीही चांगलीच करमणूक होत आहे. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचं रविवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. कपाळी अष्टगंध लावलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्घाटन मोठ्या दिमाखात हॉस्पिटलचं लोकार्पण केलं. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी रामजन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमावर चांगलंच तोंडसुख घेतलं. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खासगी नावावर नाही, असं आव्हाड यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. कोरोनमुक्त महाराष्ट्र घडो हिच श्रीराम चरणी प्रार्थना केली. प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र असून माझा जन्म नाशिकचा असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. हेही वाचा...नुसतं 'पुनःश्च हरी ओम' म्हणून चालणार नाही, मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंना कोपरखळी श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळं. गेली 40 वर्षे भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं. अख्ख्या जगाला हे माहित आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या, सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं, असा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Udhav thackeray

पुढील बातम्या