मुंबई 20 जून: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची बहिण श्वेता सिंह कीर्तीची चर्चा झाली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच श्वेताने मोठा निर्णय घेत आपलं फेबसबुक अकाउंट लॉक केलं आहे. त्याचबरोबर आपला प्रोफाईल फोटोसुद्धा डिलीट केला आहे. तिच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सुशांतच्या जाण्यानंतर तिने त्याच्याबद्दल एक भावूक पोस्टही लिहिली होती.
श्वेताने आपल्या वॉलवरच्या सगळ्या पोस्टही हाईड करून ठेवल्या आहेत. आता फक्त तिचं नावच त्यावर दिसत आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती अमेरिकेमध्ये राहते, भावाच्या जाण्याने तिचे दु:ख कल्पने पलीकडील आहे. मात्र तरी देखील श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना खंबीर राहण्याचा संदेश दिला होता.
या पोस्टमध्ये तिने एक विशेष घटना देखील नमूद केली आहे. तिच्या मुलाबरोबर झालेलं संभाषण तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ती म्हणते आहे की, जेव्हा मी माझा मुलगा निर्वाण याला सांगितलं की मामा आता आपल्यात राहिला नाही तेव्हा तो म्हणाला की 'पण तो तुमच्या हृदयात अजूनही जिवंत आहे'. हे वाक्य तो 3 वेळा म्हणाला असंही श्वेताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जर पाच वर्षाचा मुलगा अशी बाब बोलतो तेव्हा विचार करा आपण किती खंबीर आहोत, असंही श्वेता यावेळी म्हणाली.
सुशांतच्या बहिणेने त्याच्या फॅन्सना असा संदेश दिला होता की, तो आपल्या हृदयात अजूनही जिवंत आहे आणि तो तिथे कायम राहील. कृपया त्याच्या आत्म्याला त्रास होईल असं कुणीही वागू नका, खंबीर राहा.
14 जून रोजी सुशांतने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यावर 15 जून रोजी मुंबईतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या आत्महत्येची चौकशी सुरू असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अन्य बातम्या
कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं? जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य
'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने जारी केला VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.