Home /News /entertainment /

'सुशांतच्या मृत्यूबाबत केलेले दावे सिद्ध नाही केले तर...', कंगना रणौतचं मोठं वक्तव्य

'सुशांतच्या मृत्यूबाबत केलेले दावे सिद्ध नाही केले तर...', कंगना रणौतचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री कंगना रणौतने असे वक्तव्य केले आहे की, या प्रकरणाच्या तपासात ती तिची वक्तव्य सिद्ध करू शकली नाही तर ती तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करेल.

    मुंबई, 18 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नेपोटिझम या विषयावरून वादंग निर्माण झाला आहे. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी तर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. हिच मागणी काही सेलिब्रिटींनी देखील जोर लावून धरली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील फिल्म इंडस्ट्रीवर काही गंभीर आरोप केले होते. तिने देखील नेपोटिझम या विषयाला हात घातला होता. तिला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी समर्थन दिले होते. दरम्यान कंगनाने पुन्हा असे वक्तव्य केले आहे की, या प्रकरणाच्या तपासात ती तिची वक्तव्य सिद्ध करू शकली नाही तर ती तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करेल. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या दिवसांमध्ये तिच्या घरी मनाली याठिकाणी आहे. काही दिवसांपूर्वी तिने रिपब्लिक टीव्हीला एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी मला बोलावलं, पण मी मनालीमध्ये आहे, त्यामुळे मी त्यांना विचारलं की माझ्या जबाबासाठी तुम्ही कुणाला पाठवू शकता का? मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी माझ्याशी संपर्क केला नाही आहे. यादरम्यान कंगनाने अशी प्रतिक्रिया दिली आहे की- 'जर मी काही बोलले आहे आणि ते मी सिद्ध करू शकले नाही आणि जे सार्वजनिक डोमेनमध्ये नाही आहे तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. कारण मग मी यासाठी पात्र नसेन' सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाच्या टीमने तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ज्यामध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांवर निशाणा साधला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, सुशांतने आत्महत्या केली नसून हा एक नियोजनबद्ध खून आहे. कंगनानचे असे म्हणणे आहे की, फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी सुशांतला त्याच्या सात वर्षांच्या करिअरमध्ये ती जागा दिली नाही, ज्याचा तो हक्कदार होता. आज मलाही लोकं मेसेज करून सांगतात की, कठीण प्रसंग सुरु आहे, तो असे कोणतेही पाऊल उचलू नको. का माझ्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार टाकले जात आहेत, असा सवाल कंगनाने विचारला होता. इंडस्ट्रीतील काही दिग्गजांची नावं घेऊन तिने या सर्वांवर टीका केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या