Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य चोप्राची 3 तास चौकशी, मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य चोप्राची 3 तास चौकशी, मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी फिल्ममेकर आदित्य चोप्राला (Aditya Chopra) देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्राचे स्टेटमेंट घेतले आहे.

    शिखा धारीवाल, मुंबई, 18 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'नेपोटिझम' या विषयावरील वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आतापर्यंत सुशांतच्या जवळच्या व्यक्तींबरोबरच फिल्म इंडस्ट्रीमधील अनेकांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार फिल्ममेकर आदित्य चोप्राला (Aditya Chopra) देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आदित्य चोप्राचे स्टेटमेंट घेतले आहे. आदित्य चोप्रा यशराज फिल्मस (YashRaj Films) या प्रोडक्शन हाऊसचे चेअरमन आहेत. वांद्रे पोलिसांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हा जबाब नोंदवून घेतला. सुशांतने यशराज फिल्म्सबरोबर काम केले आहे. 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'ब्योमकेश बक्क्षी' हे यशराज बॅनरचे चित्रपट सुशांतने केले आहेत. (हे वाचा-उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी 'या' बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा) याआधी यशराज कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माचा देखील जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला होता. आदित्य चोप्राची जवळपास 3 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 9 ते 12 दरम्यान वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या चौकशीसंदर्भात अधिक माहिती अद्याप समोर आली नाही आहे. (हे वाचा-'सुशांतच्या मृत्यूबाबत केलेले दावे सिद्ध नाही केले तर...', कंगनाचं मोठं वक्तव्य) सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींची चौकशी झाली आहे. यामध्ये आदित्य चोप्रा, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, त्याचप्रमाणे त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्साळी यांची देखील चौकशी आतापर्यंत झाली आहे. या बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच पोलिसांनी याप्रकणी सुशांतचा कुक, त्याची बहिण, काही जवळचे मित्र यांची देखील चौकशी झाली आहे. आतापर्यंत 30 पेक्षा जास्त व्यक्तींची चौकशी झाली असून काहींना चौकशीसाठी दोन वेळा देखील बोलावण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. मात्र पोलिसांना याठिकाणी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. सुशांतने हे टोकाचे पाऊल का उचलले याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput, Yashraj films

    पुढील बातम्या