सुशांत सिंह राजपूत हा चेहरा 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने मानव ही मुख्य भूमिका निभावली होती. त्याआधी 2008 मध्ये त्याने बालाजीची 'किस देश मे रहता है मेरा दिल' या मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली होती. कालांतराने लोकप्रियता मिळवल्यानंतर सुशांतने 'काय पो चे'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर मागे वळून न बघणाऱ्या सुशांतने अनेक दर्जेदार चित्रपट केले. सुशांतने 'काय पो चे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'राबता', 'केदारनाथ', 'सोनचिडिया' या चित्रपटात काम केले आहे. त्याने साकारलेला धोनी सर्वांच्या स्मरणात राहील. (हे वाचा-आत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम? व्हायरल VIDEO मुळे खळबळ) सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide) तपास मुंबई पोलिसांच्या हाती आहे. मुंबई पोलीस हरतऱ्हेने हा प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक धागेदोरे शोधण्यात येत आहेत. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने श्वास कोंडून झाल्याने नमूद करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput