जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप

सुशांतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप

सुशांतच्या आठवणीत बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi)ला रडू आवरलं नाही. सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटात त्याच्याबरोबर संजना स्क्रीन शेअर करणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,15 जून : बॉलिवूडमध्ये अल्पावधीत प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने स्वत:चे आयुष्य संपवले. त्याच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूड आणि त्याचे चाहते अजूनही धक्क्यामध्ये आहेत. त्याने टेलिव्हिजनमधून पुढे येत मोठ्या पडद्यावर  त्याचे एक स्थान मिळवले होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना त्याच्या जाण्याने धक्का बसला आङे. त्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहत त्यांच्या  भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान सुशांतच्या आठवणीत बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi)ला रडू आवरलं नाही. सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटात त्याच्याबरोबर संजना स्क्रीन शेअर करणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत सुशांतबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने इस्टाग्रामवर म्हटल आहे ‘अभी तो इतना कुछ बाकी था सुशांत’. (हे वाचा- “अशी चूक पुन्हा करणार नाही”, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण स्वत:ला मानतोय दोषी ) सुशांत आणि संजनाना ‘दिल बेचारा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता. ‘The Fault in Our Stars’ या इंग्रजी सिनेमाचा हिंदी रिमेक ‘दिल बेचारा’ 8 मे 2020 ला प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

जाहिरात

संजना सांघीने हा व्हिडीओ शेअर करताना एक मोठी कॅप्शन देखील दिली आहे. तिने सुशांतच्या आठवणी शेअर केल्या आहे. ‘दिल बेचारा’च्या सेटवरील काही आठवणी तिने सांगितल्या आहेत. यामध्ये दोघांचा रोमान्स त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात