Home /News /entertainment /

"अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही", सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर स्वत:ला मानतोय दोषी

"अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही", सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर स्वत:ला मानतोय दोषी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहरनं (karan johar) भावूक पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येनंतर टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रिलाच धक्का बसला आहे. अनेक टिव्ही आणि बॉलीवूड कलाकारांनी सुशांतच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती मिळाली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहरनं (karan johar) स्वत:वर दोष ओढावून घेतला आहे. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर करण जोहरनं आपल्या सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने सुशांतच्या आत्महत्येमुळे आपल्याला मोठा धक्का बसला आहे. आपण यासाठी दोषी असल्याचं सांगत अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही, असं करण म्हणाला.
  करण जोहर म्हणाला, "मी स्वत:ला दोषी मानतो कारण गेली वर्षभर मी तुझ्या संपर्कात राहिलो नाही. तुला आपलं आयुष्यातील दु:ख शेअर करण्यासाठी कुणाचीतरी गरज आहे, असं मला अनेकदा जाणवलं. मात्र माझ्या भावनांना मी व्यक्त झालो नाही. अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. आपल्याला फक्त नातं बनवून फायदा नाही तर ते निभावणंही तितकंच गरजेचं आहे. सुशांतच्या निधनामुळे मला मोठा धक्का बसला आहे. सर्व नाती सांभाळण्याची गरज आहे, याची जाणीव मला करून दिली. मला तुझं ते गोड हसू आणि मिठी कायम लक्षात राहिल." करण जोहरने ट्विटरवरही सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आणि त्यानंतर ट्विटर युझर्सनी संताप व्यक्त केला आहे. तसंच बिग बॉग 6 ची स्पर्धक आणि सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भावनानीदेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर शोक व्यक्त करणाऱ्या सेलिब्रिटींना चांगलंच सुनावलं आहे. "सुशांत गेल्या काही वर्षांपासून एका कठिण परिस्थितीतून जात होता हे कुणालाच माहिती नाही असं नव्हतं. मात्र सिने क्षेत्रात कुणीच त्याच्यासाठी उभं राहिलं नाही किंवा कुणी त्याला मदतीचा हात पुढे केला नाही आणि आता त्यावर ट्विट केलं जातं आहे, यातून या क्षेत्राचं खरं रूप समोर येतं आहे. इथं कुणीही तुमचा मित्र नाही", असं ट्विट तिनं केलं आहे. संकलन - प्रिया लाड हे वाचा 8 महिन्यांपासून होती सुशांतच्या मनात खदखद, 'या' पोस्टमधून समोर आलं डिप्रेशन DEPRESSION मध्ये होता सुशांत सिंह राजपूत; 'ही' आहेत लक्षणं
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Karan Johar, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या