SSR Case: सुशांतच्या मृत्यूप्रकरणी इंग्लंड क्रिकेट संघाचं कनेक्शन, 'या' गोलंदाजानं रियावर केले होते ट्वीट

SSR Case: सुशांतच्या मृत्यूप्रकरणी इंग्लंड क्रिकेट संघाचं कनेक्शन, 'या' गोलंदाजानं रियावर केले होते ट्वीट

आज सीबीआय रिया चक्रवर्तीची (Rhea) चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही रिया चक्रवर्ती भोवतीच फिरत असल्याने या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, यातच इंग्लंडच्या गोलंदाजाचे एक ट्वीट चर्चेत आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशीला आता वेग आला आहे. आज सीबीआय रिया चक्रवर्तीची (Rhea) चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही रिया चक्रवर्ती भोवतीच फिरत असल्याने या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, यातच इंग्लंडच्या गोलंदाजाचे एक ट्वीट चर्चेत आले आहे.

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप दरम्यान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे ट्वीट चर्चेचे विषय ठरले होते. या स्पर्धेनंतर जोफ्राचे जूने ट्वीट पुन्हा व्हायरल होत होते. आता जोफ्रानं सहा वर्षांपूर्वी केलेले ट्वीट व्हायरल झाले आहे, याचे कारण म्हणजे यात रियाचे नाव होते. या ट्विटवर चाहत्यांनी आर्चर हा अंर्तज्ञानी असल्याचे म्हटले आहे.

सहा वर्षांपूर्वी रियावर केले होते ट्वीट

एकीकडे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले होते. आर्थिक प्रकरणांमध्येही तिचं नावं घेतलं गेलं होतं. त्याच बरोबर तिच्याबद्दल अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्या होत्या. तर रियानेही थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली बाजू मांडली होती. दुसरीकडे सोशल मीडियावर रियावर टीका केली जात आहे. यातच आर्चरनं 16 जुलै 2014 रोजी 'Rhea and Tessale', असे ट्वीट केले होते. टेसल म्हणजे सामान्य भाषेट पेंडंट. या ट्वीटनंतर जोफ्राला सहावर्षांपूर्वीच सर्व माहित होते, असा निष्कर्ष चाहत्यांनी लावला आहे.

वाचा-...म्हणून सुशांतला नैराश्य आलं होतं, आता चेतन भगत यांनी सांगितलं वेगळंच कारण

वाचा-SSR Death: 13 आणि 14 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? CBI पुन्हा सुशांतच्या घरी

इंग्लंडचा आघाडीचा जलद गोलंदाज आहे जोफ्रा

जोफ्रा आपल्या खतरनाक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आर्चरनं इंग्लंडला 2019मध्ये चॅम्पियन केले होते. आर्चरनं आपल्या पदार्पणानंतर एकूण 515 बाउन्सर टाकल्या आहेत. सध्या आर्चर विश्रांती घेत असून आयपीएलमध्ये आर्चर खेळण्याची शक्यता आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 24, 2020, 9:56 AM IST

ताज्या बातम्या