Home /News /entertainment /

'...म्हणून सुशांतला नैराश्य आलं होतं', आता चेतन भगत यांनी सांगितलं वेगळंच कारण

'...म्हणून सुशांतला नैराश्य आलं होतं', आता चेतन भगत यांनी सांगितलं वेगळंच कारण

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही सुशांतच्या नैराश्याच्या कारणाबाबत भाष्य केलं आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला 2 महिने उलटून गेले असले तरीही सुशांतने नेमक्या कोणत्या कारणामुळे आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, याबाबतचे तर्क-वितर्क थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाबाबत प्रत्यकेजण आपआपला अंदाज व्यक्त करत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रेटींच्या नावाचा उल्लेख करत आरोप करण्यात आला. तसंच राजकीय क्षेत्रातीलही काही व्यक्तींचं नाव या प्रकरणात घेतलं जात आहे. अशातच ज्यांच्या अनेक पुस्तकांवर आधारित सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले ते प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही सुशांतच्या नैराश्याच्या कारणाबाबत भाष्य केलं आहे. 'छिछोरे सिनेमा हिट झाल्यानंतरही त्याचं श्रेय न मिळाल्याने सुशांत नैराश्यात होता,' असा दावा चेतन भगत यांनी केला आहे. याबाबत 'अमर उजाला'ने वृत्त दिलं आहे. एकीकडे सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात आरोपांची राळ उठलेले असतानाच आता चेतन भगत यांनी आणखी एक मुद्दा चर्चेत आणला आहे. छिछोरे सिनेमांचं श्रेय न मिळाल्याबाबत सुशांतने तुमच्यापाशी त्याबद्दल भाष्य केलं होतं का? असा प्रश्नही चेतन भगत यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, 'त्याने ही नाराजी माझ्याकडे तर व्यक्त केली नव्हती. मात्र छिछोरेचं श्रेय मिळालं नसल्याने हैराण असल्याचं सुशांतने अभिषेक कपूर यांना सांगितलं होतं.' दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणातील तपासात सीबीआयकडून वेगाने चक्र फिरवली जात आहेत. सुशांतच्या घरी पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर सीबीआयची टीम आता त्यांच्या कलिना इथल्या अतिथीगृहात परतली. त्यांच्यासोबत सुशांतचा आचारी नीरज सिंह, हाऊस मॅनेजर दीपेश सावंत आणि रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी हेदेखील सीबीआयच्या टीमसोबत होते. या सगळ्यांची चौकशी आज सकाळी केल्यानंतर सीबीआयच्या टीमने सुशांतच्या घराची पुन्हा एकदा पाहणी केली. या तिघांनी दिलेले जबाब पडताळण्यात आले. तसंच सुशांतच्या घरी जाऊन या सगळ्या प्रकरणात नेमकं काय झालंय हा तपशील पुन्हा एकदा समजून घेतला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या