Home /News /entertainment /

मित्राचा मोठा दावा! सुशांत-सारा होते एकमेकांच्या प्रेमात, बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?

मित्राचा मोठा दावा! सुशांत-सारा होते एकमेकांच्या प्रेमात, बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?

सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्यूअल हावोकिप (Samuel Haokip)ने असा दावा केला आहे की, 'केदारनाथ'च्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांतच्या ऑन स्क्रीन लव्ह स्टोरीबरोबर ऑफ स्क्रीन लव्ह स्टोरी देखील सुरू होती.

  मुंबई, 20 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर त्याच्या लव्हलाइफ बद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बरोबरच्या ब्रेकअपनंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. नुकतेच त्याच्या फ्लॅटमेटने केलेल्या एका दाव्यामुळे त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा विचारात टाकले आहे. 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान (Sara Ali Khan) आणि सुशांत डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होती. आता सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्यूअल हावोकिप (Samuel Haokip)ने असा दावा केला आहे की, 'केदारनाथ'च्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांतच्या ऑन स्क्रीन लव्ह स्टोरीबरोबर ऑफ स्क्रीन लव्ह स्टोरी देखील सुरू होती. सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्यूअलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमधून असा दावा केला आहे की सुशांत आणि सारा प्रेमात होते. त्याने असे लिहिले आहे की, 'मला आठवते आहे की केदारनाथच्या प्रमोशनवेळी सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांना वेगळे करणे अशक्य होते. ते खूप खरे आणि एखाद्या बाळाप्रमाणे निष्पाप होते. त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता, जो आजकाल एखाद्या नात्यामध्ये क्वचितच आढळून येतो'. वाचा-पाकिस्तानी अभिनेत्याला घेऊन सुशांतवर सिनेमा? OTT प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण
   
   
   
  View this post on Instagram
   
   

  We accept the love we think we deserve -Stephen Chbosky

  A post shared by Samuel Haokip (@jamlenpao) on

  सॅम्यूअलने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे. त्याने आणखी पुढे असे म्हटले आहे की, 'सुशांतबरोबर सारा त्याच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा आणि स्टाफचा देखील आदर करत होती. मला आश्चर्य वाटते की कदाचित बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे 'सोनचिरिया' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर साराने सुशांतबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा.' वाचा-सुशांत मृत्यू प्रकरणाचा हे 4 अधिकारी करणार तपास; CBI ने SIT टीम केली जाहीर सॅम्यूअलच्या या पोस्टमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताना अशी कॅप्शन दिली आहे की, 'आपण त्या प्रेमाचा स्वीकार करतो, ज्याचा लायक आपण आहोत-Stephen Chbosky' त्याच्या या दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्याची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. वाचा-सुशांत सिंह राजपूत प्रकरण : 14 जूनला मृत्यू ते CBI तपास; आतापर्यंत काय काय झालं? सुशांतच्या निधनानंतर सारा अली खानने त्यांचा केदारनाथच्या सेटवरचा हसरा फोटो शेअर केला होता. त्याचप्रमाणे सुशांतच्या शेवटचा सिनेमा दिल बेचारा (Dil Bechara)च्या प्रदर्शनावेळी देखील तिने वडील सैफ अली खानबरोबरचा सुशांतचा फोटो शेअर केला होता.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Sara ali khan, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या