अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंहच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
2/ 5
सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आधीच चार जणांची टीम तयार ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मिळताच सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली.
3/ 5
हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने एका एसआयटीचं गठण केलं आबे. ज्यामध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे
4/ 5
एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि एडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करतील.
5/ 5
सीबीआयची एसआयटी लवकरच मुंबई पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणात केस डायरी, क्राइम सीनचे फोटोग्राफ, ऑटोप्सी रिपोर्ट, मुंबई पोलिसांकडील फॉरेन्सिक रिपोर्ट, पीएम रिपोर्ट आणि दाखल केलेल्या जबाबाची कॉपी लवकरच पाठविण्याचा आग्रह करतील.