Home /News /entertainment /

पाकिस्तानी अभिनेत्याला घेऊन बनवणार सुशांतवर सिनेमा? OTT प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण

पाकिस्तानी अभिनेत्याला घेऊन बनवणार सुशांतवर सिनेमा? OTT प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी माहिती पसरवली जात होती की, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे आणि यामध्ये पाकिस्तानी अभिनेता हसन खान (Pakistani Actor Hasan Khan) मुख्य सुशांतच्या भूमिकेत असेल.

पुढे वाचा ...
  मुंबई, 20 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बिहार आणि महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. याप्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करेल असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशी माहिती पसरवली जात होती की, सुशांतच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे आणि यामध्ये पाकिस्तानी अभिनेता हसन खान (Pakistani Actor Hasan Khan) मुख्य सुशांतच्या भूमिकेत असेल. या अफवांची सुरुवात हसनच्या एका अनव्हेरिफाइड इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमुळे झाली. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही प्रोजेक्ट करत नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे. (हे वाचा-Birthday Special: रणदीपने केलं आहे वेटर-ड्रायव्हरचं काम, या सिनेमाने बनवलं स्टार) 'Alhamdulillah असा एक प्रोजेक्ट मिळाला आहे, जो माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. भारतीय वेबवर सुशांतची भूमिका निभावणार आहे.' अशी कॅप्शन देत या अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये चेहऱ्यातील साधर्म्य दाखवणारा सुशांत आणि हसनचा फोटो पोस्ट करण्यात आला होता.
  हसनबरोबर कोणताही प्रोजेक्ट करत नसल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅमेझॉन प्राइमकडून देण्यात आले आहे. 'अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने अभिनेता हसन खान किंवा इतर कुणालाही घेऊन दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर कोणताही प्रोजेक्ट सुरू केला नाही किंवा परवानाकृत केला नाही', असे त्यांनी जाहीर केले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या