मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /एका आठवड्याआधीच सुशांतनं दिले होते आत्महत्येचे संकेत? आईच्या आठवणीत लिहिली होती इमोशनल पोस्‍ट

एका आठवड्याआधीच सुशांतनं दिले होते आत्महत्येचे संकेत? आईच्या आठवणीत लिहिली होती इमोशनल पोस्‍ट

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता.

मुंबई, 14 जून : प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं त्याच्या बांद्रा इथल्या राहत्या घरी आज गळफास लावून आत्महत्या केली. याआधीच इरफान खान, ऋषी कपूर त्यानंतर वाजिद खान यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड सावरत असतानाच सुशांतच्या मृत्यूनं पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला. पवित्र रिश्ता ते अगदी या सिनेमापर्यंत सुशांत कायमच चाहत्यांच्या स्मरणात राहिला. महेंद्रसिंग धोनीच्या बायोपीकमध्ये काम करताना सुशांतनं तो एक प्रतिभावंत कलावंत असल्याचं दाखवून दिलं.

सुशांतनं खरतर आपल्या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि हे सिद्ध केले होतं की त्यांच्यात प्रतिभेची कमतरता नाही. 34 वर्षीय डॅशिंग सुशांत अखेरचा 2019 मध्ये 'छिछोरे' या चित्रपटात दिसला होता. दरम्यान, सुशांतनं शेवटची पोस्ट ही आपल्या आईबाबत केली होती. सुशांतनं इनस्टाग्रामवर आईसाठी एक भावनिक कविता लिहिली होती.

वाचा-BREAKING: प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं राहत्या घरी केली आत्महत्या

सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करतो, पण यावेळी त्याने आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यात त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून, "अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई", अशी भावनिक कविता शेअर केली होती.

वाचा-धक्कादायक! एक्स मॅनेजरच्या निधनानंतर सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 

Blurred past evaporating from teardrops Unending dreams carving an arc of smile And a fleeting life, negotiating between the two... #माँ ❤️

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

वाचा-गेल्या काही दिवसांपासून सुशांत होता अस्वस्थ, नवी माहिती आली समोर

सुशांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईसोबत सुशांत अनेक फोटो शेअर करत असायचा. दरम्यान सुशांतच्या जाण्यानं एक पोकळी नक्कीच निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यानुसार डिप्रेशनवर तो उपचार घेत होता.

वाचा-अभिनेता सुशांतसिंह राजपूतने का केली आत्महत्या? मुंबई पोलिसांचा खुलासा

" isDesktop="true" id="458721" >

First published:
top videos

    Tags: Sushant Singh Rajput