Home /News /entertainment /

सुशांतकडून निसटलेले चित्रपट मिळाले होते या खास अभिनेत्याला, 3 टीम शोधत आहेत आत्महत्येचं कारण

सुशांतकडून निसटलेले चित्रपट मिळाले होते या खास अभिनेत्याला, 3 टीम शोधत आहेत आत्महत्येचं कारण

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide) तपास मुंबई पोलिसांच्या हाती आहे. मुंबई पोलीस हरतऱ्हेने हा प्रकरणाचा तपास करत आहेत

    मुंबई, 21 जन : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide) तपास मुंबई पोलिसांच्या हाती आहे. मुंबई पोलीस हरतऱ्हेने हा प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक धागेदोरे शोधण्यात येत आहेत. एका मीडिया अहवालानुसार या तपासासाठी मुंबई पोलिसांनी 3 टीम देखील बनवल्या आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी 11 तास चौकशी झाली मात्र पुन्हा एकदा तिची चौकशी होईल अशी सूत्रांची माहिती आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान, शेखर कपूर, आदित्य चोपडा, कंगना रणौत, मुकेश भट्ट आणि करण जोहर यांची देखील चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जाऊ शकते. दरम्यान सुशांतच्या चाहत्यांकडून त्याच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील काही कलाकार, दिग्दर्शक यांना जबाबदार धरण्यात येत आहे. (हे वाचा-रिया चक्रवर्ती विरोधात याचिका,सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप) मीडिया अहवालांनुसार पोलिसांची पहिली टीम बॉलिवूडमधून ज्यांची नाव समोर येत आहेत त्यांची चौकशी करत आहेत. दुसरी टीम त्याच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. त्याचप्रमाणे तिसरी टीम सुशांतच्या आत्महत्येचे आणि नैराश्याचे कारण शोधत असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत 13 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 'काय पो चे' या सिनेमातून बॉलिवूडमधून पदार्पण केल्यानंतर सुशांतने एका प्रोडक्शन हाऊसबरोबर तीन  चित्रपटांचा कॉन्ट्रॅक्ट केले होते. त्याच्या अंतर्गत सुशांतचा 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या कॉन्ट्रॅक्टमुळे त्याला ऑफर झालेले अनेक चित्रपट करता आले नाहीत. यावेळी आणखी एक अभिनेता याच प्रोडक्शन हाऊसच्या काँट्रॅक्टमुळे बांधिल होता, मात्र त्याला दुसरे चित्रपट करण्याची परवानगी देण्यात आली होती. (हे वाचा-या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये दिसला होता सुशांत, VIDEO व्हायरल) सूत्रांच्या माहितीनुसार 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी'साठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत सुशांत होता. मात्र या काँट्रॅक्टमुळे हे चित्रपट त्याच्या हातातून निसटले. कॉन्ट्रॅक्टनुसार 'बेफिक्रे' देखील सुशांतला पण मिळणार होता, पण असं झालं नाही त्यामुळे त्रासलेल्या सुशांतने या प्रोडक्शन हाऊसशी त्याचं नातं तोडलं. हे तीनही चित्रपट एकाच अभिनेत्याला मिळाले आणि ब्लॉकबस्टर ठरले होते. या अभिनेत्याचं देखील प्रोडक्शन हाऊसबरोबर कॉन्ट्रॅक्ट होते मात्र त्याला दुसऱ्या फिल्म्स करण्याची परवानगी मिळाली आणि सुशांतला ती नाही मिळाली, हा देखील तपासाचा एक अँगल आहे. या मीडिया अहवालानुसार सुशांतच्या हातातून मोठमोठे चित्रपट निसटत होते आणि प्रोडक्शन हाऊस त्याला रिलिज देखील करत नव्हते. शेवटी त्याने कॉन्ट्रॅक्टची चिंता न करता राजकुमार हिरानीचा 'पीके' हा चित्रपट साइन केला. (हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपानंतर सलमानने सोडलं मौन, म्हणाला...) यानंतरच सुशांत आणि या प्रोडक्शन हाऊसमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जरी त्याने हा प्रोडक्शनचाच 'ब्योमकेश बक्शी' हा सिनेमा केला असला तरी तो फारसा चालला नाही. त्यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर सुशांत 'पानी' हा चित्रपट करत होता, पण या प्रोडक्शन हाऊसने तो रद्द केला. चित्रपटाचे शूटिंग बंद झाल्यानंतर सुशांत अक्षरश: रडल्याची माहिती शेखर कपूर यांनी दिली होती. कारण जवळपास 11 महिने सुशांत यावर काम करत होता. सुशांतचा ड्राइव्ह हा सिनेमा देखील ओटीटीवर प्रदर्शित करण्याबाबत सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान मुंबई पोलिसांकडून लवकरच तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा सुशांतचे चाहते करत आहेत.  
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या