Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन, सहा दिवसांनंतर म्हणाला...

सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन, सहा दिवसांनंतर म्हणाला...

अभिनेता सलमान खान याने या कठीण प्रसंगात सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची साथ देण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबई, 21 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) च्या जाण्याने त्याचा मित्र परिवार, बॉलिवूड इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि त्याचे चाहते या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक विषयांवर लोकांकडून भाष्य केले जात आहे. अनेक सेलिब्रिटी देखील नेपोटिझम (Nepotism), बॉलिवूडमधील बड्या कलाकारांमध्ये असणारे वैर, झालेली भांडण याबाबत खुलेआम बोलत आहे. या साऱ्या प्रकारामध्ये अनेक कलाकारांना ट्रोल देखील व्हावे लागले आहे. अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. दरम्यान यानंतर सलमानने ट्विटरवरून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानने या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची साथ देण्याचे आवाहन केले आहे. सलमान त्याच्या ट्वीटमध्ये असं म्हणाला आहे की, 'माझ्या चाहत्यांनी माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा आणि त्यांनी वापरलेल्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक आहे.' (हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोल; या 3 सेलेब्रिटींनी ट्विटरवरून काढला पळ) सलमानने असं ट्वीट केल्यानंतर अनेकांनी यावर देखील अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी त्याच्यावर आणखी टीका केली आहे तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानवर सुशांतच्या आत्महत्येनंतर विविध आरोप लावण्यात आले आहेत. अगदी दबंगचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी देखील त्याच्यावर टीका केली आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचे करिअर संपवण्यासाठी सलमान जबाबदार आहे. गायक सोनू निगम याने सुद्धा नाव न घेता सलमानवर निशाणा साधला आहे.  
    First published:

    Tags: Salman khan, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या