मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये टाळ्या वाजवताना दिसला होता सुशांत, VIDEO व्हायरल

या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये टाळ्या वाजवताना दिसला होता सुशांत, VIDEO व्हायरल

सुरूवातीच्या काळात सुशांत शामक डावर  डान्स ग्रृपचा हिस्सा होता. यावेळी सुशांत बूगी-वूगी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये दिसला होता. त्याचा जुना व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

    मुंबई, 21 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. त्याचा चाहतेवर्ग, मित्रपरिवार पूर्णपणे कोलमडले आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या काही आठवणी अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान काही जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांत सिंह राजपूत हा चेहरा 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने मानव ही मुख्य भूमिका निभावली होती. त्याआधी 2008 मध्ये त्याने बालाजीची 'किस देश मे रहता है मेरा दिल' या मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली होती. कालांतराने लोकप्रियता मिळवल्यानंतर सुशांतने 'काय पो चे'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर मागे वळून न बघणाऱ्या सुशांतने अनेक दर्जेदार चित्रपट केले. सुशांतने 'काय पो चे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'राबता', 'केदारनाथ', 'सोनचिडिया' या चित्रपटात काम केले आहे. त्याने साकारलेला धोनी सर्वांच्या स्मरणात राहील. (हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपानंतर सलमानने सोडलं मौन, म्हणाला...) मात्र अभिनयावर प्रेम करणाऱ्या सुशांतचे डान्सवर देखील तितकेच प्रेम होते. सुरूवातीच्या काळात तो शामक डावर डान्स ग्रृपचा देखील हिस्सा होता. यावेळी सुशांत बूगी-वूगी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांमध्ये दिसला होता. 2003-04 मध्ये तो या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसला होता. त्यावेळचा सुशांतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एपिसोडमध्ये जावेद जाफरी, नावेद जाफरी आणि स्पेशल गेस्ट म्हणून आलेले अभिनेता मिथून चक्रवर्ती देखील दिसत आहेत. स्टेजवर परफॉरमन्स करणाऱ्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवताना सुशांत या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या