SSR Death : CBI चौकशीकरता रिया चक्रवर्ती DRDO गेस्टहाऊसमध्ये पोहोचली

SSR Death : CBI चौकशीकरता रिया चक्रवर्ती DRDO गेस्टहाऊसमध्ये पोहोचली

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशीकरता सीबीआयने रिया चक्रवर्तीला समन्स जारी केले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशीकरता सीबीआयने रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) समन्स जारी केले आहे. रिया चक्रवर्ती पहिल्यांदा सीबीआय चौकशीचा सामना करणार आहे. दरम्यान या चौकशीकरता रिया DRDO गेस्टहाऊसमध्ये पोहोचली आहे. शौविक चक्रवर्ती देखील पोहोचला आहे. यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी सुरुवातीला रियाचा जबाब नोंदवण्यात येईल. त्यानंतर तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी तिची चौकशी केली जाईल. यानंतर सीबीआयची टीम रिया आणि सुशांतबरोबर त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची देखील रियासमोर चौकशी करणार आहेत.

आज सीबीआयच्या 4 टीम्स डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर आल्या आहेत. दिल्लीहून आलेले सर्व अधिकारी रियाची चौकशी करणार आहेत. काल शौविक आणि इंद्रजित चक्रवर्ती यांची सीबीआयने चौकशी केली आहे.

याप्रकरणी चौकशीसाठी सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानी आतापर्यंत डिआरडिओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. सीबीआयची एक टीम शौविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि नीरज सिंह यांची चौकशी करणार आहे.

(हे वाचा-रियाने सुशांतच्या बहिणींबाबत उपस्थित केले हे सवाल, श्वेता सिंहने दिलं उत्तर)

त्याचप्रमाणे आज एनसीबी आणि ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. याप्रकरणी या दोन्ही संस्था मिळालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करत आहे. यानंतर या केसशी संबंधित असणाऱ्यांंना समन पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती मिळते आहे की, डेप्यूटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा एनसीबी च्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

(हे वाचा-'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा',छोटा शकीलचा खुलासा; रियाशी कनेक्शनबद्दल म्हणाला-)

सुशांतच्या मृत्यूनंतर जसजसे सीबीआयचा तपास पुढे सरकत आहे, यानंतर बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. न्यूज 18 इंडियाशी केलेल्या EXCLUSIVE बातचीतमध्ये छोटा शकीलमे एकीकडे रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे वृत्त फेटाळले आहे तर दुसरीकडे त्याने बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड असल्याचे म्हटले आहे. डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये आम्ही पैसे देतो. डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 28, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या