Exclusive: 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-

Exclusive: 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) जसजसे सीबीआयचा तपास पुढे सरकत आहे, यानंतर बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे  अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. न्यूज 18 इंडियाशी केलेल्या EXCLUSIVE बातचीतमध्ये छोटा शकीलमे एकीकडे रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे वृत्त फेटाळले आहे तर दुसरीकडे त्याने बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड असल्याचे म्हटले आहे. डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये आम्ही पैसे देतो.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्डच्या एंट्रीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. न्यूज 18 इंडियाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

(हे वाचा-Rhea Chakraborty EXCLUSIVE : सुशांतच्या घरातून का बाहेर पडली रिया?)

डॉन छोटा शकीलने याप्रकरणी जे नाव समोर येत आहे-गौरव आर्या त्याच्याशी ओळख असण्यासही नकार दिला आहे. छोटा शकीलच्या मते त्याने हे नाव पहिल्यांदा ऐकले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, ही सर्व कहाणी रचण्यात आली आहे की गौरवचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. आमचे गौरवशी काही घेणेदेणे नाही आहे. आम्ही रिया चक्रवर्तीला देखील ओळखत नाही. आमचे तिच्याशी काही कनेक्शन नाही.

सीबीआयची चौकशी सुरू, लवकरच सत्य समोर येईल

डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये काहीही झाले तरी त्यामध्ये अंडरवर्ल्डचे नाव जोडले जाते. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच संपूर्ण सत्य सर्वांसमोर येईल. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बाकी एजन्सी काय करत आहेत.

(हे वाचा-Me Too च्या आरोपांमुळे सुशांत जास्त दुखावला होता; रियाने फेटाळले आपल्यावरील आरोप)

जे कुणी लोक अंडरवर्ल्डबरोबर रियाचे कनेक्शन असल्याच्या गोष्टी करत आहेत, ते सपशेल खोटे बोलत आहेत. जे कुणी असा दावा करत आहे त्याने स्वत:च्या मुलांची शपथ घेऊन बोलावे की रियाशी आमचे कनेक्शन आहे. सीबीआय चौकशीआधी एखाद्याला शिक्षा सुनावणे चुकीचे आहे.

बॉलिवूडवर आमची पकड

डॉन छोटा शकीलने पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामध्ये बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, आज देखील बॉलिवूडवर अंडरवल्डची पकड आहे. आम्ही बॉलिवूडमध्ये सिनेमा बनवणाऱ्यांना आजही पैसे पुरवतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 28, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या