रियाने सुशांतच्या बहिणींबाबत उपस्थित केले हे सवाल, श्वेता सिंह किर्तीने पुराव्यांसहित दिलं उत्तर

रियाने सुशांतच्या बहिणींबाबत उपस्थित केले हे सवाल, श्वेता सिंह किर्तीने पुराव्यांसहित दिलं उत्तर

रियाने तिच्या मुलाखतीमध्ये सुशांतच्या बहिणींबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान याबाबत सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) पुराव्यांसह रियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) मुख्य आरोपपत्र असणारी त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पहिल्यांदा मीडियासमोर आली आणि तिने तिच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. सुशांतची मानसिक स्थिती, वडिलांबरोबरचे त्याचे नाते, त्याचे बहिणींबरोबरचे संबंध, दोन्ही परिवारांशी तिचे (रियाचे) संबंध यासह तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत उत्तर दिले आहे. रियाने तिच्या मुलाखतीमध्ये सुशांतच्या बहिणींबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान याबाबत सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) पुराव्यांसह रियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे त्याचप्रमाणे काही ट्वीट्स देखील या मुलाखतीनंतर केले आहे. रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीमध्ये त्याच्या बहिणींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर श्वेताने पुराव्यांसहित तिच्या आरोपांबाबत परखड शब्दांत उत्तरे दिली आहेत.

(हे वाचा-'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा',छोटा शकीलचा खुलासा; रियाशी कनेक्शनबद्दल म्हणाला-)

श्वेताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केल आहे, जे फ्लाइटचे तिकीट आहे. ज्यामध्ये असे दिसत आहे की, श्वेता 26 जानेवारी रोजी अमेरिकेतून भारतात आली होती.

ही पोस्ट शेअर करताना तिने असे म्हटले आहे की, 'रियाने तिच्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की आमचे आमच्या भावावर प्रेम नाही... चांगलं आहे, म्हणूनच मी जानेवारीमध्ये अमेरिकेतून भारतात आले, कारण जसे मला समजले की भाई (Sushant) चंदीगडमध्ये येत आहे आणि तो ठीक नाही आहे. मी माझ्या व्यवसाय बंद केला आणि मुलांना सोडले. यामध्ये देखील दु:खाची बाब म्हणजे मी माझ्या भावाला भेटू शकले नाही, कारण जेव्हा मी तिथे पोहचले होते तेव्हा तो चंदीगडमधून निघून गेला होता. कारण रिया त्याला सतत फोन करत होती आणि त्याचे काम देखील होते. कुटुंब नेहमीच त्याच्या बरोबर उभे होते. कुणाची हिंमत असेल तर एका क्षणासाठी देखील शंका उपस्थित करून दाखवावी'.

याचबरोबर श्वेताने काही ट्वीट्स देखील केले आहेत. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'भाई तिला कधीच भेटला नाही हवा होता. त्याच्या संमतीशिवाय त्याला ड्रग्ज दिले आणि त्यानंतर तो ठीक नाही आहे असे त्याला पटवून दिले, त्याला सायकायट्रिस्टकडे घेऊन गेली. कोणत्या स्तरावर ही गोष्ट तिने हाताळली? तु तुझ्या आत्म्याला काय उत्तर देशील?' श्वेताने यावेळी #ArrestRheaNow असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये देखील श्वेताने रियाला लक्ष्य केले आहे- तुझ्यामध्ये नॅशनल टीव्हीवर येण्याची आणि माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याची प्रतीमा खराब करण्याची हिम्मत आहे. तुला काय वाटतं, तु जे करत आहेस ते देव पाहत नाही आहे? माझा देवावर विश्वास आहे आणि वास्तविकतेमध्ये मी पाहू इच्छिते की तो तुझ्यासाठी काय करेल'.

आणखी एका ट्वीटमध्ये श्वेता सिंह किर्तीने असे म्हटले आहे की, 'जानेवारीमध्ये सुशांतने राणी दीला SOS कॉल केला होता. तेव्हा त्याला ड्रग देण्यात आले होते. त्यानंतर लगेच तो चंदीगडमध्ये पोहोचला होता आणि त्यावेळी 2-3 दिवसांच्या कालावधीत रियाने त्याला 25 फोन केले होते. का? त्याला परत बोलावण्याची एवढी काय गरज होती?'

Published by: Manoj Khandekar
First published: August 28, 2020, 9:56 AM IST

ताज्या बातम्या