Home /News /entertainment /

'सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं', CBI रिक्रिएशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा

'सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं', CBI रिक्रिएशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) सीबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर तपास वेगळ्या दिशेने सुरू झाला आहे. सीबीआय सूत्रांच्या मते, घटनास्थळी केलेल्या सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) सीबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर तपास वेगळ्या दिशेने सुरू झाला आहे.पो सीबीआय सूत्रांच्या मते, घटनास्थळी केलेल्या सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतच्या खोलीत इतर कोणत्याही मार्गातून आतमध्ये येऊ शकत नव्हत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यातून अशी माहिती समोर येत आहे की, सुशांतने ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती त्या खोलीची उंची 12 फूट आहे, सुशा्ंतची उंची 5.9 फूट होती तर त्याच्या पलंगाची उंची 4 फूट. सीबीआयच्या मते हे रिक्रिएशन केल्यानंतर प्राथमिक निरिक्षणात हे प्रकरणा आत्महत्या वाटत आहे. असे नाही वाटत आहे की कुणी सुशांतला मारून त्याला लटकवले असेल. मात्र सीबीआय प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. (हे वाचा-SSR Case: शिबानी दांडेकर मिस्ट्री गर्ल असल्याचा दावा, भडकली फरहानची गर्लफ्रेंड) सीबीआयच्या सूत्रांच्या मते, सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या खोलीाचा दरवाजा आतून बंद होता आणि त्याच्या खोलीमध्ये कुणीही कोणत्याही मार्गाने आतमध्ये जाऊ शकत नाही. खिडकीतून देखील कुणी येऊ शकत नाही. सीबीआयने या घटनेतील सर्व सीन रिक्रिएट करून पाहिले आहेत. (हे वाचा-सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम अहवालात गडबड, AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा) सीबीआयकडून त्याच्या वांद्रे येथील घरी सुशांतच्या आत्महत्येची घटना रिक्रिएट करण्यात आली होती. वांद्रे येथे ते घटना रिक्रिएट करत पुराव्यांशी तपासून पाहण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची उंची आणि घराच्या उंचीशी ताळमेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बेडपासून फॅनपर्यंतची उंची सुशांतच्या उंचीच्या जवळपास असल्याने तो आत्महत्या करू शकत नसल्याचा अनेकांचा दावा आहे. सुशांतच्या मृत्यूच्यावेळी उपस्थित चारजणांसोबत सीबीआयने पुन्हा क्राइम सीन रिक्रिएट केला. सुशांत दार उघडत नसल्याने चारही जणांनी काय केलं आदी बाबी पुन्हा रिक्रिएट करण्यात आल्या. यावेळी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी देखील उपस्थित होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या