Home /News /entertainment /

SSR Case : शिबानी दांडेकर 'मिस्ट्री गर्ल' असल्याचा दावा, भडकली फरहान अख्तरची गर्लफ्रेंड

SSR Case : शिबानी दांडेकर 'मिस्ट्री गर्ल' असल्याचा दावा, भडकली फरहान अख्तरची गर्लफ्रेंड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) तपास जसजसा पुढे सरकू लागला आहे, तसतसे चाहत्यांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की सुशांतच्या मत्यू घटनेतील ती मिस्ट्री गर्ल कोण आहे, याचा देखील खुलासा होईल

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) तपास जसजसा पुढे सरकू लागला आहे, तसतसे चाहत्यांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की सुशांतच्या मृत्यू घटनेतील ती मिस्ट्री गर्ल कोण आहे, याचा देखील खुलासा होईल. गेल्या काही दिवसांत काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये एक मिस्ट्री गर्ल समोर आली होती. तिच्याबाबत अनेक दावे देखील करण्यात आले होते. असा दावा देखील करण्यात आला होता की, ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कुणी नसून रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) मैत्रिण आणि फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या दाव्यानंतर शिबानी अत्यंत नाराज झाली असून तिने सोशल मीडियावरच तिचा राग व्यक्त केला आहे. (हे वाचा-सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम अहवालात गडबड, AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा) शिबानी दांडेकरने याबाबत बोलताना ट्विटरवर तिचा राग व्यक्त केला आहे. तिने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'ही मी नाही आहे आणि सिमोन देखील नाही आहे. कोणतीही शंका उपस्थित करण्याआधी सत्यपडताळणी करून घ्या. ही सुशांत सिंह राजपूतची पीआर पर्सन आणि असिस्टंट राधिका निहलानी आहे. फेक न्यूज पसरवणे बंद करा. आता खूप झाले. माझी शांतता तुम्हाला खोटं आणि द्वेष पसरवण्याचा कोणताही हक्क देत नाही.' सोशल मीडियावर शिबानीने स्पष्टीकरण दिल्यानंतर अनेकांनी त्यावरही कमेंट्स केल्या आहेत. काहींनी असा सवाल उपस्थित केला आहे की ती तिथे काय करत होती. एका युजरने तर ती राधिकासारखी दिसत नसल्याचे म्हटले आहे. तर आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवावा असा उलट सवाल देखील शिबानीला करण्यात आला आहे. मीडिया अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत समजल्यानंतर राधिका निहलानी त्याच्या फ्लॅटवर पोहोचली होती. मात्र पोलिसांनी तिला आतमध्ये जाऊ दिले नव्हते. राधिका सुशांतची कंपनी थिंक इन फाउंडेशनची सहसंस्थापक आहे. ती फिल्ममेकर आणि CBFC चीफ पहलाज निहलानी यांची सून आहे. तिने अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. यामध्ये दिया मिर्झा, रोनी स्क्रूवाला, टेरेन्स यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. (हे वाचा-सुशांतवर Black Magic? आत बाबा-बुवाही येणार CBI चौकशीच्या फेऱ्यात) सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशीचा व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसून आली. तिच्याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Shibani dandekar, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या